🌟परभणी तालुक्यात मौ.मुरुंबा येथे सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयाची शेतीशाळा तसेच महिला मेळावा🌟
परभणी (दि.२६ मे २०२३) - परभणी तालुक्यातील मौ.मुरुंबा येथे काल गुरुवार दि.२५ मे २०२३ रोजी विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग श्री.साहेबराव दिवेकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रकल्प संचालक आत्मा,परभणी श्री. दौलत चव्हाण उपप्रकल्प संचालक आत्मा श्री. बनसावडे आणि तालुका कृषी अधिकारी,श्री. कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती. स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी यांनी पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियान सप्ताह निमित्त मौजे. मुरुंबा येथे सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयाची शेतीशाळा तसेच महिला मेळावा घेण्यात आला, मार्गदर्शक म्हणून राजीव गांधी कृषी महाविद्यालय परभणीचे शास्त्रज्ञ श्री. लक्ष्मण धस सर सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते सरांनी शंकी गोगलगाय व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले, स्वाती घोडके यांनी मातीचे नमुने कसे घ्यायचे आणि माती तपासणी चे महत्व तसेच, सोयाबीन उगवण क्षमता, व बीज प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्यासाठी प्रति महिला पाच किलो निंबोळ्या गोळा करण्याचे आव्हान केले, या निमित्ताने आत्मअंतर्गत स्थापन असलेल्या गटातील सर्व महिला तसेच देवकृपा आणि लोकडोबा महिला गटातील अध्यक्ष व सचिव मुक्ता किशन झाडे, गोकर्ण ज्ञानोबा झाडे, अनुसया अंगत झाडे, आशामती बालाजी झाडे आणि गावातील सरपंच कांताबाई सोपान खंदारे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले आणि गावातील इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या....
0 टिप्पण्या