🌟शनिवारी काही रेल्वे या मार्गावर उशिराने धावणार🌟
परभणी (दि.13 जुन 2023) : परभणी जिल्ह्यातील सेलू-ढेंगली पिंपळगाव-मानवत दरम्यान शनिवार दि.17 जून 2023 रोजी लाईन ब्लॉक घेण्यात आला असल्यामुळे काही प्रवासी रेल्वे गाड्या उशिरा धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे.
शनिवार दि.17 जुन 2023 रोजी गाडी क्रमांक 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हजूर साहिब नांदेड तपोवन एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान 135 मिनिटे उशिरा धावेल.गाडी क्रमांक 17630 नांदेड -पुणे एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान 50 मिनिटे उशिरा धावेल. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान 190 मिनिटे उशिरा धावेल. गाडी क्रमांक 12788 नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस दिनांक 13 जून रोजी जालना ते सेलू दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल. गाडी क्रमांक 17232 नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस दिनांक 17 जून रोजी जालना त सेलू दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल. तर गाडी क्रमांक 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 14 आणि 18 जून रोजी धर्माबाद येथून 60 मिनिटे उशिरा म्हणजेच सकाळी 5 वाजता सुटणार आहे.
* दोन गाड्या अंशतः रद्द :-
दक्षिण मध्य रेल्वेने कळविल्यानुसार, लाईन ब्लॉकमुळे दोन गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक 11409 दौंड-निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 14 ते 17 जून दरम्यान मुदखेड ते निझामाबाद मध्ये अंशतः रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01413 निझामाबाद-पंढरपूर एक्स्प्रेस दिनांक 15 ते 18 जून दरम्यान निझामाबाद ते मुदखेड मध्ये अंशतः रद्द करण्यात आली आहे......
0 टिप्पण्या