🌟ऋषिकेश म्हस्के यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची राळेगणसिद्धीत घेतली भेट🌟
✍️ मोहन चौकेकर
बुलढाणा : ग्रामीण विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव ऋषिकेश म्हस्के गत काही दिवसांपासून ग्रामविकास अभ्यास दौरा करीत आहे. या दौऱ्याचा भाग म्हणून राज्यातील आदर्श गावांना भेटी देऊन म्हस्के ग्राम विकासाचा पॅटर्न तज्ञांकडून समजून घेत आहे. 10 जूनला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची राळेगणसिद्धीत भेट घेऊन म्हस्के यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
भेटीदरम्यान अण्णा हजारे म्हणाले की,ग्रामसभा ही ग्रामसंसद असून तिचे लोकशाहीत अतिशय महत्वाचे स्थान आहे.ग्रामसभांना अनेक अधिकार देण्यात आले असून त्यांची माहिती अद्याप अनेक सामान्य नागरिकांना नाही.लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी ग्रामसभांचे महत्व सामान्य लोकांना समजावून सांगून त्याचा प्रचार प्रसार करावा असे आवाहनही जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
सन २०११ ला महाविद्यालयीन शिक्षणासाठी राळेगणसिद्धीत होतो. त्यामुळे अण्णा हजारे यांनी केलेली जलसंधारणाची कामे, भ्रष्टाचार विरोधातील आंदोलने, याचा बारकाईने अभ्यास करता आला. ग्रामविकासाच्या आराखड्यासाठी राळेगणसिद्धीचा पॅटर्न उपयोगी ठरणार असल्याचे ऋषिकेश म्हस्के यांनी सांगितले.
* बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव ऋषिकेश म्हस्के यांची प्रतिक्रिया....
ग्राम विकास हाच केंद्र बिंदू असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांना समोर जाण्यासाठी ग्रामविकास आराखडा तयार करत आहे. ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ग्रामविकास अभ्यास दौरा पूर्ण केला......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या