🌟वसमत तालुक्यातील बारेपूरवाडी येथील प्रकाश जळबाजी पाईकराव हरवल्या बाबत....!


🌟याबाबत वसमत शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल🌟

वसमत (दि.२६ जुन २०२३) - वसमत तालुक्यातील बारेपूरवाडी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील प्रकाश जळबाजी पाईकराव वय 61 वर्ष, रंग सावळा ,बांधा सडपातळ, अंगात फुल भायांचे निळे शर्ट व काळी पॅन्ट तसेच त्यांना अर्धांगवायू झाल्याने पाय फरकत फरकत चालतात व अस्पष्ट बोलतात अशी व्यक्ती दिनांक 15 जून रोजी सकाळच्या आठ वा. सुमारास त्यांचे राहते घर येथून कोणालाही न सांगता बाहेर पडले आहेत ते अद्याप पावतो घरी परत आलेले नाहीत सदरील व्यक्ती बाबत कोणासही माहिती असल्यास किवा  आढळल्यास वसमत शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम ( 📱  7083552233 )पोलीस हवालदार गजानन भोपे (  📱  9923316576 ) यांच्याशी संपर्क साधावा .

   याबाबत वसमत शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल असून याबाबत पुढील तपास वसमत शहर पोलीस करत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या