🌟विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांच्या आदेशाने परिक्षेत्रांतर्गत पाच पोलिस निरिक्षकांच्या बदल्या🌟
पुर्णा (दि.२८ जुन २०२३) - नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक श्री.शशिकांत महावरकर यांच्या आदेशान्वये दि.२७ जुन २०२३ रोजी पोलिस आस्थापणाच्या झालेल्या बैठकीत नि:शस्त्र पोलिस निरिक्षकांच्या विनंतीवरून परिक्षेत्रांतर्गत ०५ पोलिस निरिक्षकांच्या जा.क्र.विपोमनि/आस्था-१/पोनि-विनंती बदल्या-२०२३/२८११ आदेशान्वये बदल्या करण्यात आल्या असून यात परभणी जिल्हा पोलिस दलात कार्यरत पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांची नांदेड पोलिस दलात तर पो.नि.गणपत राहिरे यांची परभणी जिल्हा पोलिस दलातून हिंगोली जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे तर हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत पो.नि.सुनिल निकाळजे व पो.नि.विश्वनाथ झुंजारे यांची देखील नांदेड जिल्ह्यात बदली करण्यात आली असून परभणी जिल्हा पोलिस दलात कार्यरत पो.नि.सुनिल रेजितवाड यांची लातूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.....
0 टिप्पण्या