🌟गंगाखेड तालुक्यातील मौ.रूमणा (ज) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व मार्गदर्शन मेळावा संपन्न....!


🌟यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून सुप्रसिद्ध किर्तनकार तथा उद्योजक हभप.सखारामजी रनेर बलशेकर यांची उपस्थिती🌟 


गंगाखेड (दि.२६ जुन २०२३) - गंगाखेड तालुक्यातील मौ. रूमणा (ज.) येथे एकच ध्यासग्रामीण भागातील शैक्षणिक विकास या न्यायाने गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम व मार्गदर्शन मेळावा उत्साहात साजरा झाला. 

यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कृषी  विषयावरील सुप्रसिद्ध  कीर्तनकार तथा उद्योजक हभप.सखारामजी रनेर बलशेकर, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणत्याही क्षेत्रात गेले तर चिकाटी मेहनत जिद्द ज्यांच्याकडे आहे तोच यशस्वी होतो अशी त्यांनी मार्गदर्शनात बोलताना सांगितले. यावेळी बाल व्याख्याती, अस्मिता कदम यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, मुलीला व मुलाला समान वागणूक द्या असे तिने आपल्या भाषणातून व्यक्त केले, विद्यार्थी मार्गदर्शक प्रा. गणेश सर यांनी देखील आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, गावचा विकास व्हायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे अशी त्यांनी सांगितले, सोलुशन कोचिंग क्लासेस चे संचालक व कवी शिवश्री गजानन बेले सर, यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजसेवक बालासाहेब रामेश्वरजी सोळंके, गावचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय सोळंके, शेतकरी नेते बंडू सोळंके, उपसरपंच संतोष कोड गीर, समाजसेवक बालासाहेब रामेश्वरजी सोळंके, नारायण सोळंके, राम भैय्या कोडगीर, अशोक सोळंके,बळीराम सोळंके, माऊली सोळंके, भोगराज सोळंके , मेघराज सोळंके, अंगद सोळंके,गोपाळ सोळंके, हनुमान सोळंके,व इतर गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिद्धेश्वर सोळंके यांनी केले, तसेच प्रास्ताविक ज्ञानोबा कदम, अंकुश कदम यांनी केले, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शा. व्य. समितीचे अध्यक्ष संजय सोळंके यांनी केले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळाने व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या