🌟परभणी महानगर पालिका आयुक्तांद्वारे मनपाच्या शाळांची पाहणी....!


🌟शिक्षकांशी साधला हितगुज : विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल चिंता🌟

परभणी (दि.२३ जुन २०२३) : महानगरपालिका शाळांना मनपा आयुक्त तथा प्रशासक सौ. तृप्ती सांडभोर यांनी शुक्रवार दि.२३ जुन रोजी भेट दिली. त्या भेटीतून विद्यार्थ्यांची संख्या, शैक्षणिक गुणवत्ता,भौतिक सुविधा आढावा घेतला. तसेच शिक्षकांशी हितगुज केले.

          आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांनी ज्ञानेश्‍वर नगरातील मनपा शाळेस सर्वप्रथम भेट दिली. त्या भेटीतून शाळेतील स्वच्छता, फर्निचर, अन्य भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची संख्या, शालेय पोषण आहार, गणवेश, पाठ्यपुस्तकाचे वितरण, शैक्षणिक गुणवत्ता तसेच नवीन उपक्रमांबद्दल शिक्षकांबरोबर हितगूज केले. विद्यार्थ्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. विद्यार्थ्यांच्या घसरलेल्या संख्येबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. महानगरपालिकेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे, तरच विद्यार्थी मनपा शाळाकडे वळतील, अन्यथा शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घसरत राहील, असे नमूद करीत शिक्षकांद्वारे नवनवीन असे उपक्रम राबविले जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. शिक्षणासारखे पवित्र कार्य प्रत्येकाने इनामे-इतबारे पार पाडले पाहिजे, असे त्या म्हणाल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या