🌟परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाची महामहीम राष्ट्रपतीकडे निवेदना द्वारे मागणी🌟
परभणी (दि.०३ मे २०२३) - ऑलंपिकसह इतर विविध क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकासह इतर अनेक पदक पटकावून कुस्ती सारख्या खेळामध्ये जागतीक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी न्याय मिळावा यासाठी मागील दोन महिन्यापासून आंदोलन सुरु केले आहे. याच लैंगिक सोशन प्रकरणामध्ये भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष विरोधात पोस्को अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल झालेला असतानाही त्यांच्यावर कार्यवाही होत नाही. यामुळे व्यथित झालेल्या जागतीक पातळीवरील भारतीय महिला कुस्तीपटूंनी त्यांचे आंदोलन तीव्र स्वरुपात चालू ठेवले आहे.
दिल्ली येथे सुरू असलेल्या भारतीय महिमा कुस्तीपटुंच्या या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्ष परभणीचा पाठिंबा असून महामहीम राष्ट्रपती मोहदयांनी या प्रकरणात लक्ष घालून महिला कुस्तीपटुंना न्याय मिळवून देवून हे आंदोलन मिटवावे अश्या प्रकारची विनंती करणारे एक निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांना जिल्हा प्रशासनाच्या मार्फत पाठवण्यात आले सदरील निवेदन उपविभागीय अधिकारी श्री दत्तू शेवाळे यांना देण्यात आले.
महिला कुस्तीपटूंना दोन महिने आंदोलन करून हि अद्याप न्याय मिळाला नसून केंद्र सरकारकडून न्यायाची अपेक्षा नसल्यानेच देशाच्या महामहिम राष्ट्रपती एक महिला असल्याने त्यांनीच आत्ता महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून द्यावा असे ही या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, मिडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, अंकुश गिरी,ॲड.सुवर्णाताई देशमुख, सुषमाताई देशपांडे, रामेश्वर पुरी, सय्यद युनूस, शेख बशीर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत....
0 टिप्पण्या