🌟नांदेड जिल्ह्यातील बोंढार हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी....!


🌟या प्रकरणी शासनाने डोळेझाक करून न्याय प्रक्रियेत विलंब लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा🌟



पुर्णा (दि.05 जुन 2023) : नांदेड जिल्ह्यातील मौजे बोंढार येथे अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाच्या पुढा- काराने भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.याचा जळफळाट जातीयवादी मनोवृत्तीच्या लोकांना झाला आणि या मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी शेवटी जयंती काढण्यास पुढाकार घेणाऱ्या अक्षय भालेराव या सुशिक्षित तरुणाचा तो किराणा दुकानावर गेला असताना त्याला जयंती काढतोस का, लय मजलास काय असे बोलून कुरापत काढून तीक्ष्ण हत्यारानेत्याच्या पोटात वार करून त्याचा निर्घृण खून केला त्याने जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करत लोकांना धावा केला,तेंव्हा गावातील विज घालवून बौद्ध वस्तीवर दगडफेक करून गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले.बचावासाठी आलेल्या अक्षयच्या भाऊ आणि आई यांच्यासह सर्व नातेवाईकांना बेदम मारहाण केली.या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयन्ती का केली?

या रागाने या गावगुंडांनी हा दुर्दैवी प्रसंग घडविला.माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध पूर्णा येथे आंबेडकरवादी संघटनाच्या वतीने आज संघटितरित्या करण्यात आला.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांना एक निवेदन पाठविण्यात आले या निवेदनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.जातीयवादाला खतपाणी घालणारे असवैंधानिक,बेकायदेशीर महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे.सदरचे प्रकरण सि.आय. डी. कडे सुपूर्द करून जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे. व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी गावात सामाजिक सलोखा निर्माण होईपर्यंत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयासह तेथील बौद्ध वस्तीला संरक्षण देण्यात यावे.आपतग्रस्त कुटुंब प्रमुखाला त्याचे उदरनिर्वाहासाठी शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी, व त्यांना भरीव आर्थिक मदत करण्यात यावी.अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या असून या प्रकरणी शासनाने डोळेझाक करून न्याय प्रक्रियेत विलंब लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

         राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर भदंत डॉ उपगुप्त महाथेरो,भदंत पांय्यावश, रिपाई नेते प्रकाश कांबळे, ॲड.हर्षवर्धन गायकवाड, ॲड. धम्मा जोंधळे,उत्तम खंदारे,त्रिंबक कांबळे,अमृत कऱ्हाले,दिलीप गायकवाड,श्रीकांत हिवाळे, ॲड.महेंद्र गायकवाड,प्रवीण कनकुटे,मुंजाजी गायकवाड,किशन ढगे, राम भालेराव,साहेबराव सोनवणे,मोहन लोखंडे, चंद्रमणी लोखंडे,मिलिंद सोनकांबळे,संजय शिंदे,अनुसायाबई खरे, मंजुषताई पाटील,शिवकन्याबाई कांबळे,शोभाबाई कांबळे,सविता आहिरे,रेखा आहीरे ,मीराबाई गायकवाड,आदि मोठ्या संख्येने महिला मंडळाच्या पदाधकाऱ्यां स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या