🌟‘घर हर नर्सरी’त रोपे तयार करताना देशी वाणांचा आग्रह जलशक्ती अभियान व अमृत सरोवर मोचाही घेतला आढावा🌟
परभणी (दि.२६ जुन २०२३) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावयाचे आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला मोठे उद्दिष्ट दिले असून, शक्यतो जिल्ह्यात देशी वृक्ष लागवड करण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे वृक्षारोपणाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांनी नियोजन करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) निवृत्ती गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदिप घोन्सीकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार माधव बोथीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर सुरवसे, सर्वश्री गट विकास अधिकारी बाबुलाल शिंदे (नरेगा), अंकुश चव्हाण, शिवराज केंद्रे, व्ही. एम मोरे, एम. पी. कदम, शिवाजी कांबळे, जयराम मोडके, जी. के. मंडलिक, जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे, अशोक भंगिरे, नायब तहसीलदार सुरेखा पटवे यांच्यासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि जिल्हा यंत्रणेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील वनाखालील क्षेत्र कमी आहे. ते भरून काढण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यासह मराठवाड्यात वनाच्छादित क्षेत्र वाढावे, यासाठी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. वृक्षारोपणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांनी सर्व जिल्हा यंत्रणेला ‘हर घर नर्सरी’च्या माध्यमातून देशी वाणांची रोपे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्षारोपणाची ही प्रक्रिया संपूर्ण पावसाळाभर राबविता येणार असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोपे लागणार आहेत. ही रोपे तयार करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागासह, कृषि, जलसंधारण, रेशीम विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायती, नगरपालिका, पोलिस, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय विभागांनी आपापल्या कार्यालयांमध्ये किंवा संबंधित आस्थापनांमध्ये रोपवाटिका तयार कराव्यात, असे जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी सांगितले.
तसेच ज्या विभागांनी ‘हर घर नर्सरी’ किंवा रोपवाटिका तयार केली नसल्यास त्यांनी ती आता करावी किंवा सीडबॉलचा वापरही वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी करता येईल. शिवाय रोपे विकत घेऊनही उद्दिष्ट साध्य करण्याबाबतच्या सूचना देताना शक्यतो, सर्व विभागांनी रोपवाटिकेतून रोपे तयार करूनच ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे श्रीमती गोयल म्हणाल्या. वृक्षारोपणाची मोहीम राबविताना देशी वाणांच्या बियांसाठी सामाजिक वनीकरणाची मदत घेता येईल. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर देशी झाडांचे बियाणे उपलब्ध असल्याचे सांगून विभागांना मोहिमेसाठी रोपे तयार करण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर योजना राबविण्यात येत असून त्याअनुषंगाने जिल्ह्यातील विविध तलावांमधून गाळ काढण्यात येत आहे. याला गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवाराचीही जोड देण्यात आली आहे. अमृत सरोवर योजनेच्या माध्यमातून तलावांमध्ये पाणीसाठा वाढविण्याचे जिल्हा यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासोबतच जलशक्ती अभियानाचाही आज जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आढावा घेतला....
0 टिप्पण्या