🌟यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी,शिखर बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक सम्राट पुरकायस्थ यांची उपस्थिती🌟
परभणी (दि.२८ जुन २०२३) : शालेय विद्यार्थ्यांपासूनच देशातील नवी पिढी आर्थिक साक्षर व्हावी, त्यांना याबाबतचे अद्ययावत ज्ञान मिळावे, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, मुंबई आणि परभणी शिखर बँकेच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरतेवर विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय प्रश्न मंजुषेचे परभणी आणि पाथरी येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, शिखर बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक सम्राट पुरकायस्थ, विभागीय व्यवस्थापक विश्वजित करंजकर, जिल्हा व्यवस्थापक उदय कुलकर्णी, सेवानिवृत्त जिल्हा व्यवस्थापक सुनील हत्तेकर, मुख्याध्यापक श्री. पारसकर आणि संचालक जितेंद्र सिंह कुशवाह उपस्थित होते.
आर्थिक साक्षरतेच्या प्रयत्नांना आणखी चालना देण्यासाठी आणि भारत जी-२० अध्यक्षपद भूषवत आहे. या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेवर अखिल भारतीय प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका शाळांवर लक्ष केंद्रित करून गट स्तरावर सुरू करण्यात आली. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा जिल्हा, राज्य आणि विभागीय स्तरावरील विविध भागांमधून पुढे राष्ट्रीय स्तरापर्यंत सुरु राहणार आहे.
परभणी आणि पाथरी येथे तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा घेण्यात आली. परभणी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषेचा स्पर्धेत जि. प. हायस्कूल दैठणा प्रथम, जि. प. हायस्कूल, जांब द्वितीय आणि जि. प. हायस्कूल पेडगाव हा तृतीय ठरला असून, विजेत्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक सम्राट पुरकायस्थ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
तर पाथरी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम जि.प. हायस्कूल देऊळगाव गात, द्वितीय जि.प. हायस्कूल बोरी आणि तृतीय क्रमांकांवर कस्तुरबा गांधी कन्या शाळा मानवतला उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.....
0 टिप्पण्या