🌟एसीबीच्या पथकाने ०५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना महिला पोलिस हिस रंगेहाथ ताब्यात घेतले होते🌟
परभणी (दि.२१ जुन २०२३) : परभणी जिल्ह्यातल्या पाथरी पोलिस स्थानकातील लाचखोर महिला पोलिस कर्मचारी हिला काल मंगळवार दि.२० जुन २०२३ रोजी दुपारच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ०५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले होते.
दरम्यान, या महिला पोलिस कर्मचार्यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने ०२ दिवसांची पोलिस कोठडी सूनावली जायकवाडी प्रकल्पाच्या जागेत अतिक्रमण करुन वास्तव्यास असणारे व अवैध व्यवसाय करणारे यांच्या विरोधात तक्रारकर्त्याने त्रास पोटी उपोषण केले होते. प्रकल्पाच्या जागेवर अतिक्रमण करुन राहणाऱ्यांपैकी एकाने तक्रारकर्ते यांच्यावर पाथरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे तक्रारकर्त्या विरोधात गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणात तक्रारकर्ता यांना त्यांच्या विरुध्दच्या दाखल गुन्ह्यात मदत करण्याकरीता महिला पोलिस कर्मचारी यांनी लाच मागितली. तेव्हा संबंधित तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. या विभागाने तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा संबंधित महिला पोलिस यांनी तक्रारकर्ता यांना पंचासमक्ष पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हे निष्पन्न झाले. त्याआधारे या पथकाने पाथरी येथील ओंकार नगर भागातील सुविधा मार्ट या ठिकाणी संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्यास तक्रारकर्त्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले. या प्रकरणात या विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, चंद्रशेखर निलपत्रेवार, सीमा चाटे, कल्याण नागरगोजे, मोहम्मद झिब्राहील व कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली होती....
0 टिप्पण्या