🌟पुर्णा नगरीत अवतरली पंढरी : आषाढी महोत्सवामुळे शहरात सर्वत्र टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर....!



🌟स्वा.सै.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आषाढी महोत्सवाने दिला राष्ट्रीय/सामाजिक एकात्मतेचा संदेश🌟


परभणी/पुर्णा (दि.२९ जुन २०२३) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरात मागील अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विशाल कदम संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यसैनिक दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने 'आषाढी महोत्सवाचे' आयोजन केले जाते या आषाढी महोत्सवा मुळे पुर्णा शहराला जणूकाही विठोबा माऊलींच्या पंढरपूर नगरीचे स्वरुप प्राप्त होते प्रती वर्षा प्रमाणे आज गुरुवार दि.२९ जुन २०२३ रोजी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यसैनिक दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने 'आषाढी महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले होते टाळ मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात भव्य पालखी सोहळा रंगला संपूर्ण शहरातून विठू माऊलीच्या पालखीसह दिंडी जुना मोंढा मैदानावर आल्यानंतर या मैदानावर अत्यंत उत्साहपुर्ण व धार्मिक वातावरणात  भव्य रिंगण सोहळा पार पडला. 

 

      येथील स्वातंत्र्यसैनिक दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आषाढी महोत्सवानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता नवा मोंढा मैदानावरून विठुरायाची मूर्ती असलेली पालखी टाळ मृदंगाच्या गजरात शेकडो भाविक, वारकरी शिक्षण संस्थेचे बाळगोपाल टाळकरी, अश्व, दिंड्या लेझीम पथक, मैदानी खेळाचे पथक, यांच्यासह विविध देखावे सहभागी झाले होते. विजयकुमार कदम व भास्कर भाले यांच्या हस्ते प्रारंभी विठ्ठल रुखमाईच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी आरती केली. शहरातील मुख्य मार्गावर जागोजागी पालखीची पूजा करून आरती करण्यात येत होती. रांगोळ्या रेखाटल्या होत्या. 

भगव्या पताकांनी शहर सजले होते. विविध वारकरी शिक्षण संस्था तील चिमुकले वारकरी हे सुंदर भजन गात होते. सुहागन येथील छत्रपती संभाजी महाराज विद्यालयाचे लेझीम पथक लक्षवेधी होते. विद्या प्रसारिणी शाळेचे सज्जन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट मैदानी प्रात्यक्षिके सादर केली. बस स्थानक रोड वरून मिरवणूक महात्मा बसवेश्वर चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - महादेव मंदिर - श्री गुरु बुद्धी स्वामी मठ - जुना मोंढा मैदानावर पोहोचली. यावेळी भव्य रिंगण सोहळा पार पडला. मान्यवरांनी टाळ मृदंगाच्या गजरावर ठेका धरत फुगड्या खेळत व पावली खेळत आपला आनंद व्यक्त केला. सुत्रसंचालन गोपाळ भुसारे यांनी केले. अमृतराज कदम यांनी आभार मानले. सोहळा यशस्वी करण्यासाठी विशाल कदम यांच्या सह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य, सेवाभावी संस्था, भाविक यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या