🌟भरघाव टिप्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न होताच प्रसंगावधान राखून मारली उडी : घातपात की अपघात ? पोलिस तपास सुरू🌟
धाराशिव (उस्मानाबाद) - उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शिवसेना (ठकरे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर टिप्परच्या धडकेतून बालबाल बचावले खासदार निंबाळकर आज शनिवार दि.१० जुन २०२३ रोजी सकाळच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी जात असतांना समोरून भरघाव वेगाने येणारा टिप्पर सरळ अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या बाजूला उडी मारल्यामुळे ते या टिप्परच्या धडकेतून थोडक्यात बचावले आहेत.यावेळी पोलिसांनी तात्काळ घटना स्थळावर दाखल होऊन टिप्पर चालक आरोपीला पकडलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी व्यायाम करायला जात असताना टिप्परच्या धडकेतून थोडक्यात बचावले आहेत. भरधाव टिप्पर त्यांच्या अंगावर आलं. मात्र ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारली. त्यामुळे ते या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.
0 टिप्पण्या