🌟या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांच्या हस्ते झाले🌟
नांदेड (दि.17 जुन 2023) :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे 14 जून रोजी जागतिक क्लबफुट (जन्मजात वाकडे पाय असलेले व्यंग) दिनानिमित्त बाहयरुग्ण विभागात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी क्लबफुट (जन्मजात वाकडे पाय असलेले व्यंग) असलेल्या 350 बालकांवर उपचार करण्यात आलेल्या बालकांना शैक्षणिक साहित्य देवून अधिष्ठाता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्लबफुट आजारामध्ये जन्म:तच बाळाचे पाय वाकडे असतील तर हा एक जन्मदोष असतो. याला क्लब फुट असे देखील म्हणतात. हा दोष असल्याने बाळाचे पाय आत किंवा बाहेरच्या बाजूस वळत नाहीत. काही बाळांमध्ये ही समस्या केवळ एकाच पायात दिसते तर अनेक बाळांमध्ये ही समस्या दोन्ही पायांत दिसू शकते. जर वेळीच हा दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही तर मुल मोठे झाल्यावर त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याला चालताना सुध्दा समस्या सुध्दा निर्माण होऊ शकते. सर्जरीच्या सहाय्याने हा जन्मदोष दूर करता येऊ शकतो. या आजारासंबंधी समस्या व उपचाराबाबत यावेळी मार्गदर्शन केले.
सन 2014 पासून क्लब फुट असलेल्या बालकांसाठी हा कार्यक्रम अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे राबविल्या जात आहे. आतापर्यंत शेकडो बालकांवर या कार्यक्रमांतर्गत उपचार व शस्त्रक्रिया करुन त्यांचे अपंगत्व दूर करण्यात आले आहे. या कार्यक्रमास डॉ.जी.एस. मनुरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अंबुलगेकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, अस्थिरोग विभाग, नियोजन अधिकारी डोळे व क्लबफुटचे प्रतिनिधी मार्टिना मॅडम, अफ्रेड व बालकांचे पालक उपस्थित होते....
0 टिप्पण्या