🌟परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलावर हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी केला सामुहिक योगा....!


🌟जागतिक योग दिन : योग प्रात्यक्षिक व सुंदर योग नृत्य🌟


परभणी (दि.२१ जुन २०२३) : जागतिक योग दिना निमित्त आज बुधवार दि.२१ जुन २०२३ रोजी परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी विशेष कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित प्रसासन,शिक्षण,अन्य क्षैत्र तसेच योग संस्थांच्या आधिकारी,कर्मचारी, पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक,विद्यार्थी, वकिल,डाँक्टर,अभियंता,व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व योग शिक्षकांनी  सामुहिक योगा केला. योग शिक्षक प्रशिक्षणार्थी यांनी योग प्रात्यक्षिके तर मुला मुलींनी सुंदर योग नृत्य सादर केली.


येथील स्टेडियम मैदानावर सकाळी साडेपाच वाजल्यापासून योग शिक्षण संस्था ंच्या पदाधिकाऱ्यांसह योग साधकांची गर्दी सुरू झाली, सकाळी साडेसहा वाजता शिक्षक,प्रशिक्षक व विद्यार्थ्यांच्या गर्दीने हे स्टेडियम मैदान फुलले होते जिल्हाधिकारी सौ.आँचल गोयल यांच्या हस्ते या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन औपचारिकरित्या करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून हे अध्यक्षस्थानी होते.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती राग सुद्धा आर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी रश्मी खांडेकर, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सौ. तृप्ती सांडभोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपजिल्हाधिकारी शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तूबाकले, तहसीलदार चव्हाण जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार आदी उपस्थित होते. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष तथा योगसाधक सुभाषराव जावळे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड यांनी या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रतिमापूजन, स्वागत गीताने या कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी निरामय योग परिवाराने योग दिनानिमित्त काढलेल्या "विश्व कल्याणाचा योग मार्ग'या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच जागतिक योग दिनानिमित्त उत्सव समितीने आयोजित केलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी निबंध व योगासन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. निबंध स्पर्धेत वैशाली सुनील पोटेकर यांनी प्रथम, अस्मिता अनंतराव अवचार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला अन्य स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षीस वितरित करण्यात आली.

 या कार्यक्रमाचे संचलन भक्तराज गांगुर्डे सौ. अंजली लक्ष्मीकांत पाथरीकर यांनी केले. उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाषराव जावळे यांनी प्रास्ताविकातून योग दिनामागील भूमिका स्पष्ट केली. शिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे यांनी आभार मानले. येथील स्टेडियम मैदानावर आयोजित केलेल्या या भव्य दिव्य अशा सामूहिक योग दिनाच्या कार्यक्रमात प्रशासन, शिक्षण, शाळा महाविद्यालय ,योग संस्था, तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या