🌟राज्यसेवा परीक्षेत ‘सारथी’चा डंका ; ६७ विद्यार्थी उत्तीर्ण : शासन आपल्या दारी....!


🌟नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कृषिसेवा स्पर्धा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर🌟 

परभणी (दि.20 जुन 2023) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत कृषीसेवा विभागाच्या निकालात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे, (सारथी)च्या ६७ विद्यार्थ्यांनी यशस्वी भरारी घेतली असून, त्यामध्ये उपसंचालक कृषि पदी ५, कृषि अधिकारी ३९ तर तालुका कृषि अधिकारी म्हणून २३ जणांची निवड झाली असल्याचे ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सांगितले आहे.

नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कृषिसेवा स्पर्धा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या निकालात सारथी पुणे मार्फत प्रायोजित महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा उतीर्ण केलेल्या लाभाथ्यांपैकी ६७ विद्याथ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यशस्वी ६७ विद्यार्थ्यांपैकी ५ जणांची उपसंचालक (कृषि) ३९ कृषि अधिकारी आणि २३ विद्यार्थ्यांची तालुका कृषि अधिकारी पदी निवड झाल्याची माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 सारथी ही शासकीय संस्था, संस्था कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत असून राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी कार्यरत केली आहे. सारथीमार्फत प्रायोजित एमपीएससी (कृषिसेवा) स्पर्धा परीक्षा २०२१ प्रशिक्षण उपक्रमातील ६७ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाल्याची बाब अतिशय आनंददायी असून, राज्य शासनाच्या या उपक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 

एमपीएसी (कृषी सेवा) २०२१ परीक्षेतही सारथी विद्यार्थ्यांनी देदिप्यमान असे यश मिळविलेले असून पहिल्या दहामध्ये सारथीच्या तीन विद्याथ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्याथ्यांची यादी सारथीच्या www.sarthi- maharashtragov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षा २०२१ चे प्रशिक्षण घेऊन यश मिळविलेले विद्यार्थी अहमदनगर१३, सोलापूर १२, पुणे ९, कोल्हापूर ७, सातारा ५, सांगली ४, अकोला २, अमरावती २, बुलढाणा २, धुळे २, उस्मानाबाद २, वाशिम २, औरंगाबाद, भंडारा, हिंगोली आणि जालन्यातील प्रत्येकी एकाचा आणि नाशिकमधील दोघांचा समावेश आहे. सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर भाप्रसे (सेवानिवृत्त) यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून महाराष्ट्राच्या कृषि विकासाला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या