🌟महाराष्ट्र शासनाच्या योजना फलदायी असतात त्यांचा अभ्यासपूर्ण लाभ घ्यावा...!


🌟असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी केले🌟 

पुर्णा (दि.०६ जुन) - शासनाच्या योजना फलदायी असतात त्यांचा अभ्यासपूर्ण लाभ घ्यावा शासन आपल्या दारी आले योजना समजुन घ्या गरजवंताला योजना  मिळाव्यात असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी केले.


गौर येथील श्री सोमेश्वर मंगल कार्यालयात "शासन आपल्या दारी " योजनेचा तालुकास्तरीय उदघाटन सोहळ्याचे आयोजन (ता .06) मंगळवार रोजी करण्यात आले होते कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष 

 आमदार रत्नाकार गुट्टे , उपविभागीय आधिकारी गंगाखेड सुशांत शिंदे , तहसीलदार माधवराव बोथिकर , नायब तहसीलदार नितीशकुमार बोलेलु , गटविकास आधिकारी जयराम मोडके,मुख्यकार्यकारी आधिकारी  युवराज पौळ  , तालुका कृषीअधिकारी आबासाहेब देशमुख , भूमीअभिलेख दामोशन , पोलीस निरीक्षक सूर्यकांत मुळे , डॉ. सुरेश गिनगिने , डॉ.अरविंद वाघमारे , गणेश कदम , गटशिक्षणाधिकारी मारोती सूर्यवंशी , ग्रामविकास आधिकारी सरपंच चंद्रकांत सावळे  ,सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता बी. एस .भोसले , दुय्यम निबंधक दिंगबर सोनटक्के, पशुसंवर्धन आधिकारी श्रीनिवास कारले , प्रविण काळे, वाघमोडे , विलास जोशी , स्वप्नील शिंदे , आनंता पारवे , प्रल्हाद पारवे यांच्यासह कृषीविभाग , पंचायत समिती तहसिल, सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .

        शासन आपल्या दारी नविन उपक्रमात तालुक्यातील सर्व आधिकारी व सर्व विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते . समस्या निवारण केंद्र ,तक्रार पेटी , मानव विकास बस मोफत पास वाटप , श्री सोमेश्वर विद्यालयातील राजस्तरीय विजेता खेळाडू भगवान सरोदे, माध्यामिक व उच्यमाध्यमिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , पानंद मुक्त रस्ते शेतकरी बांधवांचा सत्कार , श्रावणबाळ , निराधार , दिव्यांग अदी विविध विभागाचे ४५ हजार प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले .कार्यक्रमात श्री सोमेश्वर भगवान देवस्थानास २५ लक्ष निधी रत्नाकार गुट्टे यांनी जाहीर केला . देवस्थानचे संचालक सोपानराव जोगदंड यांनी सत्कार केला .

पुढे बोलतांना आमदार रत्नाकार गुट्टे म्हणतात शेतकरी बांधवांना अनेक योजनाचा लाभ घेतांना दलालाकडुन प्रत्येक विभागात त्रास सहन करावा लागत आहे यापुढे तक्रार आली तर कोणाचीही गय केली जाणार नाही विद्युत वितरण विभागाला सतर्क राहात नाहीत म्हणून धारेवर धरले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामविकास आधिकारी ए. आर. लाडेकर व ग्रामपंचायत सद्स्य व गौर ग्रामस्त यांनी प्रयत्न केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव बोथीकर यांनी केले सूत्रसंचालन प्रा.पुंडलिक जोगदंड यांनी केले आभार प्रदर्शन शरद जोगदंड यांनी केले .......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या