🌟धाडू नको खट्याळ वारा- भर्र भर्र...पडू दे ना पाण्यासंगे गारा- गार गार।
कवी : कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
मेघा रे मेघा रे, तुला माझी आण रे।
पाणी आण आधी, पाणी आण रे।धृ।
विणा पाणी सृष्टी गमे बेजार।
तुझा असा कोरा कसा शेजार।
वेळा आली तरी तू बेफाम का।
आम्ही सारे झालो अता बेजाण रे!१!
तुझी फक्त आदळ आपट-
धड् धड् धडाडधूम।
विजेचा भारी थयथयाट-
कड् कड् कडाटकड।
अशा भयान अंधारी हृदयात- थर थर थरारम।
अंगा सुटे दरदरून घाम बेभान रे!२!
साऱ्या नजरा भेदरलेल्या आकाशाकडे।
धारा थांबव अंगा अंगांच्या तुला साकडे।
लाही लाही अंग होतो रे।
होतो मोठा मनी त्रागा रे!३!
सळ सळ सळाक पाने वाजू दे।
टप टप टपाक पाणी पाड रे।
काळ्या काळ्या नभीच्या ढगा रे।
जाऊ दे वाहून तनमनाचा त्राण रे!४!
धाडू नको खट्याळ वारा- भर्र भर्र ।
पडू दे ना पाण्यासंगे गारा- गार गार।
चिंब भिजू दे घामाघूम अंगा रे।
बेधुंद नाचू दे कृगोनि मनमोरा रे!५!
कृगोनि- कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
गडचिरोली, मोबा- ७७७५०४१०८६.
0 टिप्पण्या