🌟‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात हजारो नागरिकांनी लावली उपस्थिती🌟
जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर
जिंतूर (दि.१७ जुन २०२३) : विविध शासकीय विभागाच्या योजना लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येत असून, आतापर्यंत जिंतूर तालुक्यात १३ हजार ९९३ नागरिकांनी शासन आपल्या दारी उपक्रमातून लाभ घेतला आहे. आज माऊली मंगल कार्यालय, जिंतूर येथे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर, उपविभागीय अधिकारी जिवाजी डापकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, तहसीलदार रणजित कोळेकर, नायब तहसीलदार डॉ. परेश चौधरी, तालुका कृषि अधिकारी श्री. कच्छवे, गटविकास अधिकारी सुनिता वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी श्री. बोराळकर, जिंतूर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. चांडगे, कार्यालय अधीक्षक नगरपालिका रामराव चव्हाण, एकात्मिक बाल विकास विभागाच्या श्रीमती कोकणे, गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे आदी यावेळी उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सतत चकरा माराव्या लागू नयेत. त्यांना शासकीय योजना सहज आणि एकाच छताखाली उपलब्घ व्हाव्यात यासाठी तहसील प्रशासनाने शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आज शुक्रवारी जिंतूर येथे आयोजन केले होते. शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत जिंतूर तालुक्यात शासकीय योजनांशी निगडीत आतापर्यंत जवळपास १४ हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
यामध्ये रहिवाशी प्रमाणपत्र १ हजार ४८०, उत्पन्न प्रमाणपत्र ६ हजार ८२७, वय आणि अधिवास प्रमाणपत्र ३९६, अल्पभूधारक १५, ऐपत दाखला २३, शेतकरी दाखला १२, आर्थिक दुर्बल (राज्य व केंद्र) ४४२ आणि १४६, नॉन क्रिमिलेअर ४१३, महिला आरक्षण १५, मतदार ओळखपत्र ३ हजार ६४४, शबरी आवास योजना १२४९, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना २५२, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना १७८, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ८१, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना १ हजार ४०३, राष्ट्रीय कृषि विकास योजना १५७, राष्ट्रीय कृषि विकास योजना कांदाचाळ २४, राज्य कृषि यांत्रिकीकरण योजना २०४, उप अभियान कृषि यांत्रिकीकरण योजना १६१, जननी सुरक्षा योजना ६४२, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना १ हजार ३२३, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ४ हजार ६७३, निरीक्षण पोषण आहार २८५, आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ३ हजार ३९, मानव विकास अंतर्गंत बुडीत मजुरी ६३५, दीड ते तीन वर्षे वयोगटातील बालके ३९०, गरोदर व स्तनदा माता यांना पुरक पेाषण आहार पुरविणे २ हजार ७४, अडीच वर्षे ते तीन वर्ष वयोगटातील १ हजार २६६ बालकांना गरम व ताजा आहार पुरविणे, दुधाळ जनावरे लाभार्थी संख्या १८, कुक्कुट पक्षी विकास योजनेंतर्गत १०० एकदिवसीय कुक्कुटपक्षी वाटप योजनेत चार लाभार्थी, निर्धूर चुली २ हजार ७००, कुक्कुटपालन, डाळ उद्योग आणि डेअरी संकलन केंद्र, आयसीआयसीआय बँकेतर्फे महिला बचत गटांना ६ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गंत ३७ लाभार्थी, प्रधानमंत्री स्वनिधी योजना ४१, रमाई आवास योजना ४६, नामांतर ५२, प्रधानमंत्री जनआरोग्या ८७८ गुंठेवारी १०६, जन्ममृत्यू प्रमाणपत्र ३३२, पीटीआर नक्कल २७५, महसूल विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना ६३९, रेशन कार्ड २८७०, रहिवाशी प्रमाणपत्र १ हजार ४८०, उत्पन्न प्रमाणपत्र ६ हजार ८२७ अशा एकूण १३ हजार ९९३ लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.....
0 टिप्पण्या