🌟योगातील ध्यान प्राणायाम आणि योगासने नियमित केल्यानंतर तणावापासून मुक्ती मिळतेे - डॉ.व्यंकट कदम
पुर्णा (दि.२१ जुन २०२३) - पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व क्रिडा विभागाच्या वतीने अंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नियमित योगासने केल्यास शरीर सशक्त व चपळ आणि लवचिक बनतात त्यांचबरोबर शरीराचे स्नायू बळकट बनतात व शरीराला योग्य प्रकारचे ठेवण तयार होते.योगा करणे हे आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे परंतु योग करताना योगाची योग्य पद्धत समजून घेऊन योग करणे आपल्या शरीराला फायदेशीर ठरते.योग म्हणजे शरीराचा व्यायाम नसून योग मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणाऱ्या विज्ञानाचा एक भाग आहे.योग अभ्यासातून मानवी जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.आपल्या शरीरातील आणि मनातील ताणतणाव दूर करायचा असेल तर त्यासाठी योग फायदेशीर ठरतो .योगातील ध्यान प्राणायाम आणि योगासने नियमित केल्यानंतर तणावापासून मुक्ती मिळतेे असे मत डॉ.व्यंकट कदम यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले ,याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर, डॉ. शिवसांब कापसे,पर्यवेक्षक प्रा. उमाशंकर मिटकरी, एमसीवीसी पर्यवेक्षक प्रा. अबाजी खराटे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर, डॉ.अजय कुऱ्हे क्रिडा विभागाचे सतीश बरकुंटे महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षेत्तर कर्मचारी, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या