🌟पुर्णा शहर मुकले डॉ.संजय लोलगे यांच्यासारख्या लोकहीतवादी नेत्याला :- नगरसेवक ॲड.राज भालेराव
पुर्णा (दि.१३ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे मा.सदस्य बि बियाने महामंडळाचे सदस्य डॉ.संजय प्रकाशराव लोलगे यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दि.१२ जुन २०२३ रोजी दुपारच्या सुमारास दुःखद निधन झाले या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरल्यामुळे पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा विधिज्ञ ॲड. राज भालेराव यांनी या घटने संदर्भात दुःख व्यक्त करीत आपला दि.१३ जुन २०२३ रोजी असलेला अभिष्ठचिंतन सोहळा अर्थात वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुर्णा तालुक्यातील बहुजन समाजातील स्वाभिमानी सुसंस्कृत व लोकहीतवादी शेतकरी हितचिंतक नेते डॉ.संजय लोलगे यांच्या अकस्मात दुःखद निधना बद्दल त्यांनी तिव्र शोक व्यक्त करीत असे नमूद केले आहे की डॉ.संजय लोलगे यांच्या दुःखद निधनामुळे पुर्णा तालुक्यातील सर्वसामान्य जनता एका शेतकरी हितचिंतक जनहीतवादी कर्तृत्ववान नेत्याला मुकली असून ही घटना अत्यंत दुःखद असल्यामुळे मी उद्या मंगळवार दि.१३ जुन २०२३ रोजी आपला वाढदिवस साजरा करणार नाही त्यामुळे माझ्या समस्त कार्यकर्त्यांसह हितचिंतक तथा मित्र परिवाराला माझी नम्रतेची विनंती आहे की त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मला हारतुरे तसेच शुभेच्छा देण्याचे टाळून डॉक्टर साहेबांना विनंम्र श्रध्दांजली अर्पीत करीत लोलगे कुटुंबाच्या दुःखात सहभाग नोंदवून इश्वरा चरणी त्यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी प्रार्थना करावी.....
0 टिप्पण्या