🌟परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया चालू वर्षातच होणार - केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया


🌟केंद्रीय राज्य मंत्र्यांसह दोन्ही खासदारांना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीयांचे ठोस आश्‍वासन🌟


परभणी (दि.१३ जुन २०२३) : परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया या शैक्षणिक वर्षापासूनच सुरु करण्यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे ठोस आश्‍वासन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिल्यामुळे आशेचा किरण जागा झाला आहे.


             केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची आज गुरुवार दि.१५ जून २०२३ रोजी खासदार श्रीमती फौजिया खान व माजी आमदार अ‍ॅड.विजय गव्हाणे यांनी छत्रपती संभाजीनगरात भेट घेतली व या वर्षीपासूनच परभणीच्या मेडीकल कॉलेजमधून प्रवेश प्रक्रिया सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अर्थराज्यमंत्री कराड यांनी तात्काळ आरोग्यमंत्री मांडवीया यांच्याशी संपर्क साधून परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत. काहींद्वारे या प्रक्रियेत हेतुतः अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळेच सर्वार्थाने मागास असणार्‍या या जिल्ह्यातील गोर-गरिबांवर अन्याय करण्यासारखाच तो प्रकार आहे, असेही स्पष्ट केले. या वर्षीपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, असा आग्रह केला. मांडवीया यांनी त्यासंबधी सवार्थाने प्रयत्न होतील, असे ठोस आश्‍वासन दिले.

               शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनीही आज गुरुवार दि.१५ जुन २०२३ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीया यांची भेट घेतली. त्यातून या महाविद्यालयाने सर्व प्रकारच्या त्रुटी पूर्ण केल्या आहेत, हे स्पष्ट करीत यावर्षीपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरु होईल, असे प्रयत्न व्हावेत, असा आग्रहधरला. मांडवीया यांनी या प्रश्‍नात निश्‍चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट.... केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या