🌟आर्य वैश्य समाजातील गरजवंत परीत्यक्त्या विधवा महिलांना उपजीविका भागविण्यासाठी पिठाची गिरणी वाटप कार्यक्रम...!


🌟जिंतूर तालुका महासभा नूतन कार्यकारिणी शपथग्रहण सोहळ्याचे आयोजन🌟

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी.रामपूरकर

आर्य वैश्य समाजातील गरजवंत परीत्यक्त्या विधवा महिलांना उपजीविका भागविण्यासाठी पिठाची गिरणी वाटप कार्यक्रम आणि महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची परभणी जिल्हा कार्यकारिणीची बैठक आणि जिंतूर तालुका महासभा नूतन कार्यकारिणी शपथग्रहण सोहळ्याचे आयोजन रविवारी ता ४  जिंतूर येथील नगरेश्वर मंदिराच्या सभागृहात करण्यात आले आहे . 

      सकाळी ९ वाजता जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक होणार असून सकाळी ११ वाजता महासभेच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा होणार आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार पुणे हे तर महेश  महाराज जिंतूरकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे . प्रमुख पाहुणे म्हणून महासचिव गोविंद बिडवई , कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार , राज्य बांधकाम समिती अध्यक्ष भानुदास वट्टमवार पुणे, राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटील परभणी, बांधकाम समिती कोषाध्यक्ष अनिल मनाठकर  नांदेड, उपाध्यक्ष किरण वट्टमवार , राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार , राज्य प्रसिद्धी प्रमुख पत्रकार नरेंद्र येरावार हे उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमातच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती , संचालक व इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होणार असून परभणी जिल्ह्यातील समाजाच्या गरजवंत महिलांना स्वावलंबी होण्यासाठी सह्याय म्हणून पिठाची गिरणी वाटप कार्यक्रम  आयोजित केला आहे . 

     या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महासभेचे जिल्हाध्यक्ष बालाजी डुब्बेवार , जिंतूर आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सखाराम चिद्रवार व किरण वट्टमवार जिंतूर महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या