शहरातील नागरी वसाहतींमध्ये मांस विक्रीसह जनावरांच्या कत्तलीला नगर परिषद प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्र दिलेच कसे असा प्रश्न आता गंभीर स्वरुप धारण करतांना दिसत असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ शहरातील या डॉ.आंबेडकर चौक रोड,स्वामी दयानंद सरस्वती चौक,लोकमान्य टिळक रोड परिसरात राहणाऱ्या व मुख्य रोडवरुन येजा करणाऱ्या सर्व सामान्य लोकांना या नर्खयातनेतून मुक्त करण्याच्या दृष्टीने कठोर पाऊल उचलतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुर्णा शहरातील नागरी वसाहतींसह प्रमुख मार्गांवर देखील मांस विक्रेत्यांनी आपली दुकान थाटली असून संबंधित मांस विक्रेते दुकानात कुठलाही आडोसा न करता खुली मांस विक्री करीत असल्यामुळे तसेच जनावरांच्या कत्तली दुकानांमध्येच करीत असल्यामुळे मांस भक्षण न करणाऱ्या लोकांसाठी हा परिसर अक्षरशः किळसवाणा झाल्याचे दिसत आहे स्वामी दयानंद सरस्वती चौकातील अपेक्स टेलर्सच्या आसपास तसेच रेल्वे कंपाऊंडला लागुन असलेल्या रवि जैस्वाल वाईन शॉप परिसरात थाटलेल्या चिकन मटण मच्छी विकणाऱ्या दुकान मालकांच्या हुकुमशाही पध्दतीमुळे भिमनर,कुरेशी मोहल्ला,डॉ कांबळे हॉस्पिटल समोरील रोड,डॉ झुंजारे हॉस्पिटल परिसरात पोलीस स्टेशन जवळील अगंदी काही अंतरावर नगरपालिका प्रशासनाच्या कृपा आशिर्वादाने विविध जनावरांचे अक्षरशः बेकायदेशीर कत्तलखाने सुरू करण्यात आलेले आहे.
रेल्वे तडीपार परिसरात कोंबडे बकरे तसेच गोवंशाची कत्तल करून मोठ्या प्रमाणात निघालेला संपूर्ण जैव कचरा व जनावरांचे अवयव परिसरात टाकून परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेशी जिवघेणा खेळ करीत असतांना मुख्याधिकारी युवराज पौळ व नगर परिषद स्वच्छता विभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे......
0 टिप्पण्या