🌟जिंतूर-परभणी रोडवरील येसेगाव पाटी जवळ दारुचा ट्रक उलटला...!


🌟परिसरातील नागरिकांनी दारुचे काही बॉक्स पळवले🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.११ जुन २०२३) : शहरापासून जवळच असलेल्या जिंतूर- परभणी महामार्गावरील पांगरी शिवारातील येसेगाव पाटीजवळ विदेशी दारू घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना दि. १० शनिवार रोजी सकाळी चारच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक येथून विदेशी दारू घेऊन नांदेड कडे जाणारा ट्रक क्रमांक एम. एच ४६.ए.एफ. ५८६० जिंतूर मार्गे नांदेड कडे जात असताना जिंतूर पासून जवळच असलेल्या पांगरी शिवारातील येसेगाव पाटी पासून १०० फुटावर पहाटे चारच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने कट मारल्याने सदरील ट्रक महामार्गाच्या खाली उतरल्याने पलटी झाल्याचे चालकांनी सांगितले. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकमधील मालाचे व ट्रकचे मोठे नुकसान झाले. दरम्यान ट्रक उलटताच परिसरातील नागरिकांची दारूच्या बाटल्या नेण्यासाठी चांगलीच झुंबड उडाली होती. मात्र पोलिस वेळीच हजर झाल्याने नागरिकांची पांगापांग झाली. घटनेची माहिती मिळताच राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झालेली नव्हती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या