🌟आम्हाला देवाने मारले आहे तुम्ही मारून काय उपयोग असे म्हणत तृतीय पांथियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले🌟
परभणी (दि.२० जुन २०२३) - गंगाखेड रोडवरील उमरी फाटा येथे भिक मागणाऱ्या तीन तृतीय पंथांवर कारवाई केल्यानंतर तृतीयपंथी आक्रमक झाले असून पहिलेच आम्हाला देवाने मारले आहे तुम्ही मारून काय उपयोग असे म्हणत तृतीय पांथियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.पोलिसांनी आम्हाला तुम्ही खरंच तृतीयपंथी आहात का असे दाखवा म्हणत आमच्यावर अत्याचार केला असल्याचा आरोप पोलीस प्रशासनावर करण्यात आला आहे दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावी या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले आहे.
परभणी गंगाखेड महामार्गावरील उमरी फाटा येथे तृतीय पंथी संदिप मारोतराव कच्छवे वय २५ वर्षे, रा. दैठणा ता. जि. परभणी, जिया मुस्कान शेख वय २१ वर्षे, रा. नेहरू नगर परमणी, माईरा समशेर पठाण वय २३ वर्षे रा. नेहरू नगर हे शनिवार १७ जून रोजी सकाळी उमरी फाट्याजवळ पाथरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रसवंतीच्या दुकानासमोर गथीरोधकाजवळ येणाऱ्या जाणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना हाताने इशारा करून व वाहने थांबवल्यानंतर लोकांना भीक मागत होते. मात्र वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे आणि अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दैठना पोलीस ठाण्यात घेऊन गेले या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र हा प्रकार घडल्यानंतर आज सर्व तृतीयपंथी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले या ठिकाणी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले मात्र दैठणा पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये असताना साडीवरील तुम्ही खरंच तृतीयपंथी आहात का असे दाखवा म्हणत अत्याचार केला असल्याचा आरोप तृतीय पांथियानी केले आहेत. पोलिसांनी आपल्याला सुंदरीने मारून असे देखील बोलले असल्याचा आरोप करण्यात आला आहे तृतीयपंथीयांनी पोलिसांवर केलेले आरोप अत्यंत गंभिर असल्यामुळे आत्ता या प्रकानाची चौकशी पोलीस अधीक्षक करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या