🌟नेत्यांच्या वाढदिवसाला रेशनकार्ड वाटप करून स्टंट करणारा प्रहार जनशक्ती पक्ष नाही - जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने


🌟पुर्णा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रेशन कार्ड लाभार्थ्यांना रेशन धान्याचे वाटप🌟

पुर्णा (दि.१६ जुन २०२३) - मागील दोन महिन्यापूर्वी प्रहार जनशक्ती पक्ष शाखा पूर्णाच्या वतीने पूर्णा शहरातील दिव्यांग, निराधार, भिक्षेकरी व विधवा भगिनी यांच्यासाठी पक्षाचे शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी अंतोदय व प्राधान्य गट योजनेतील ७६ लाभार्थ्यांसाठी मोफत रेशन कार्ड तयार करून रेशन कार्डचे वाटप केले होते.काल दिनांक १५ जून २०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते ज्या लाभार्थ्यांना दोन महिन्यापूर्वी रेशनकार्ड देण्यात आले होते त्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष शासकीय नियमानुसार रेशन धान्य वाटप करण्यात आले.

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पूर्ण शहर प्रमुख संजय वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले व प्रहार हा जमिनीवर काम करणारा पक्ष असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय कसा मिळवून दिला जाईल यासाठी निस्वार्थपणे झगडणारा चालणारा पक्ष आहे. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त फोटो साठी बोगस रेशनकार्ड वाटप करायचे नंतर त्या लाभार्थ्यांना रेशन धान्य मिळते की नाही या कडे दुर्लक्ष करायचे असे फालतू धंदे प्रहार जनशक्ती पक्ष करत नाही. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ज्या लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड देण्यात आले त्या सर्वांचे रेशन कार्ड ऑनलाइन करणे तसेच त्यांना प्रत्यक्ष रेशन धान्याचा लाभ मिळणे त्याचबरोबर रेशन कार्ड वर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा व शासकीय सुविधा कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो असे ही शिवलिंग बोधने म्हणाले. या वेळी पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड यांनी पण उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी केले तर अली नगर शाखाप्रमुख अय्युब शाहा शब्बीर शाहा व क्रांती नगर शाखाप्रमुख अकबरी बेगम सय्यद मुनिर यांनी अथक परिश्रम घेतले, तर सलीम शाहा,खाजा शाहा,एजाज शाहा,कांचन गायकवाड,प्रणिता गायकवाड,सुनीता गायकवाड यांनी या कामात सहकार्य केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या