🌟पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पोळ शहरातील कोट्यावधीच्या बोगस विकास कामांचा घोळ मिटवतील का ?


🌟शहरातील बोगस विकासकामांच्या विरोधातील तक्रारीचे निवारण न करता मुख्याधिकारी ठरवत आहेत तक्रारदारांनाच गुन्हेगार ?🌟


पुर्णा (दि.१७ जुन २०२३) - पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा नव्यानेच पदभार स्विकारलेले मुख्याधिकारी युवराज पोळ यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्या पुर्वीच्या काळात तसेच त्यांच्या काळात देखील आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून त्या तक्रारदारांचे समाधान करण्याऐवजी व पुर्णा नगर परिषदे अंतर्गत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विविध विकासकामांतील घोळांची चौकशी करून भ्रष्ट गुत्तेदारांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांनाच आरोपीच्या कठड्यात उभे करून त्यांचा मुलभूत हक्क हिरावून घेण्याची हुकूमशाही पद्धत अवलंबत असल्याने मुख्याधिकारी पोळ यांचा कारभार 'नव्यानेच आले अन् तिखट झाले आणि भ्रष्टाचारांच्या बरबटलेल्या हातचे अमृत प्याले' अश्या पद्धतीचा झाल्याने नगर परिषद प्रशासना अंतर्गत मागील वर्षानुवर्षे आपली मक्तेदारी चालवत एकतर्फी गुत्तेदारी चालवणाऱ्या मर्जीतील भ्रष्ट गुत्तेदार व भष्ट गुत्तेदारांचे पाठीराखे आजी-माजी लोकप्रतिनिधी यांना अक्षरशः हत्तीचे बळ आल्याचे दिसत असून संबंधित भ्रष्टाचारी मंडळी हत्तीने मुंगीला पायाखाली तुडवावे या पद्धतीने तक्रारदारांना किड्या मुंग्याच्या दृष्टीने पाहत असल्याचे निदर्शनात येत आहे त्यामुळे पूर्णा नगरपालिके अंतर्गत झालेल्या कोट्यावधी रुपयाच्या घोळावर मुख्याधिकारी पोळ पांघरूण टाकण्याचा केविलवाना प्रकार तर करीत नाहीत ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुर्णा शहरातील मस्तानपुरा नई आबादी,सराफा बाजार,महावीर नगर,पंचशील नगर,हरी नगर,विजयनगर,रमाई नगरसह अनेक भागात करोडो रुपये खर्च करून अवघ्या काही महिन्यांपुर्वी तर काही भागात अल्पशः कालावधीपुर्वी बांधण्यात आलेल्या सिमेंट रोड/सिमेंट नाल्यांची अक्षरशः धुळधाण उडत असल्याचे दिसत आहे काही भागात करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सिमेंट रोडची अवस्था भुकंपात तडा गेल्यागत झाल्याचे तर काही भागात सिमेंट रस्त्यांची अवस्था पांदण रस्त्यांसारखी झाल्याने संबंधित गुत्तेदार व पडद्यामागील आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच नगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तशरीफवर शहरातील नागरी पान खाऊन थुंकत असल्याचे निदर्शनास येत आहे असे असताना मुख्याधिकारी एखाद्या इतिहासातील युवराजा प्रमाणे युवराजी आवेशात तक्रारदार पत्रकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याने मुख्याधिकारी पौळ यांच्या युवराजी कारभारा विरोधात शहरात संतप्त वातावरण निर्माण होत आहे तर काही सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या