🌟पुर्णा-पालम-अहमदपूर-लातूर व मानवत-पाथरी-सोनपेठ-परळी या दोन नवीन रेल्वे मार्गांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी...!


🌟रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवत बाजगीर यांनी दिले निवेदन🌟

परभणी (दि.२६ जुन २०२३) - परभणी दौऱ्यावर महा जनसंपर्क अभियाना निमित्त आयोजित  कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार श्री.रावसाहेब दानवे पाटील यांना आज भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवत बाजगीर यांच्याकडे निवेदनाद्वारे पूर्णा-पालम-अहमदपूर-लातूर व मानवत-पाथरी- सोनपेठ-परळी वैजनाथ या दोन नवीन रेल्वे मार्गाची मागणी केली.

 या प्रसंगी व्यासपीठावर आमदार मेघनादीदी बोर्डीकर,माजी आमदार मोहनभाऊ फड, महानगराध्यक्ष आनंदराव भरोसे, प्रदेश सदस्य सर्व श्री.संतोषभाऊ मुरकुटे,विठ्ठल मामा रबदाडे,ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस अनंतराव गोलाईत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या