🌟यासाठी कोणतीही फीस राहणार नाही. पालक हे अर्ज कुठुनही अपलोड करु शकतात🌟
हिंगोली : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा (2024) इयत्ता 6 वी वर्गात प्रवेशाकरीता दिनांक 20 जानेवारी, 2024 शनिवार रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 01.30 वाजता हिंगोली जिल्ह्यातील ठरलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार असून त्याकरीता आवेदन पत्र ऑनलाईन भरण्यास सुरुवात झाली आहे. आवेदन पत्र ऑनलाईन भरण्याचा शेवटचा दिनांक हा 10 ऑगस्ट, 2023 असा आहे. हे प्रवेश अर्ज संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतीही फीस राहणार नाही. पालक हे अर्ज कुठुनही अपलोड करु शकतात. त्याकरीता पुढील काही बाबी आवश्यक आहेत.
यामध्ये विद्यार्थ्याचे आधार कार्ड, विद्यार्थी व पालकाची स्कॅन केलेली सही. विद्यार्थ्याचा फोटो (JPG फॉरमॅट मध्ये असावा) तसेच फोटोची साईज ही 10 ते 100 केबी मध्ये असावी. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील स्कॅन केलेले प्रमाणपत्र. सदरहू प्रमाणपत्र हे विद्यालयाच्या वेबसाईटवर http://www.navodaya.gov.in/nvs-school/Hingoli/ena/home & www.navodaya.gov.in वर डाऊनलोड लिंकमध्ये उपलब्ध आहे. तसेच याच वेबसाईट वरुन विद्यार्थी दिलेल्या लिंकद्वारे प्रवेश अर्ज करतील. अर्ज अपलोड करण्याची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, 2023 ही आहे. तरी संबंधित विद्यार्थी-पालक व मुख्याध्यापक यांनी याची नोंद घ्यावी.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी विस्तुत माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या वेबसाईट http://www.navodaya.gov.in/nvs-school/Hingoli/ena/home & www.navodaya.gov.in वर उपलब्ध आहे. त्यासंबंधी अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.वाघमारे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.....
*****
0 टिप्पण्या