🌟नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अभिनंदन यासाठी की त्यांनी आज पहिल्या टप्प्यात ६१ पत्रकारांचा १० लाखांचा विमा उतरविला🌟
एखाद्या पत्रकारास अपघात झाला किंवा कोणी पत्रकार आजारी पडला तर त्याची होणारी ससेहोलपट जीवघेणी असते.. अशा कठीण प्रसंगी तो ज्या माध्यमात काम करतो तो माध्यम समुह त्याच्या पाठिशी उभा राहात नाही, सरकारकडून काही मदत मिळत नाही.. ना समाज अशा वेळी मदत करतो.. मराठी पत्रकार परिषद जरूर हाकेला ओ देते पण ती मदत पुरेशी नसते .. हा अनुभव राज्यातील अनेक पत्रकारांना आलेला आहे.. त्यामुळे गतवर्षीच "आम्ही आमच्यासाठी" ही मोहीम मराठी पत्रकार परिषदेने हाती घेतली आहे.. त्यानुसार प्रत्येक जिल्हा आणि तालुका संघांनी आपल्या सदस्यांना विमा कवच द्यावे असे सांगण्यात आले आहे.. आतापर्यंत काही जिल्हा आणि तालुका संघांनी हा उपक्रम राबविला असला तरी ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबविली गेली पाहिजे असा मराठी पत्रकार परिषदेचा प्रयत्न आहे.. असं झालं तर पत्रकारांना व्यक्तीगत स्वरूपात कधी, कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही.
नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अभिनंदन यासाठी की त्यांनी आज पहिल्या टप्प्यात ६१ पत्रकारांचा १० लाखांचा विमा उतरविला आहे. दहा लाखांचा हा अपघाती विमा असून कोणी जखमी झाल्यास या विम्याच्या माध्यमातून त्याला उपचाराचा खर्चही मिळणार आहे. आजच्या शिबिरात उपस्थित ६१ पत्रकार सभासदांचा विमा काढण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली गेली यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी, परिषदेचे पदाधिकारी, पत्रकार, पोस्टाचे अधिकारी,आयुष्यमान भारत योजनेचे समन्वयक तसेच बजाज अलियांज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले राज्यातील अन्य जिल्हा आणि तालुका संघांनी नांदेड जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श घेऊन आपल्या सदस्यांना तातडीने विमा कवच मिळवून द्यावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे.....
_________________________________________
0 टिप्पण्या