🌟या कार्यक्रमास बाळू बुधवंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती🌟
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जिंतूर शहरालगत असणाऱ्या हुतात्मा स्मारक मुख्य रस्ता ते औंढा महामार्ग, जुनी पुंगळवेस ,वरूड रोड, सचिन डिपार्टमेंटल स्टोअर आदी रस्त्याचे भूमिपूजन आज दिनांक चार जुलै 2023 रोजी जिंतूरच्या आमदार मेघनादी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडले.
जिंतूर शहर अगदी झपाट्याने वाढत आहे. मागील वीस - पंचवीस वर्षापासून या रस्त्याची मागणी या भागातील नागरिक वेळोवेळी करत आलेले आहेत. या भागात विविध महाविद्यालय, शाळा,रुग्णालय, वसतिगृहे आहेत.
हा रस्ता जुन्या जिंतूरला जोडला जाणारा एक प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता विकसित झाल्याने जिंतूर शहरात प्रवेश करण्यासाठी एक बायपास तयार होईल; त्यामुळे लोकांना मुख्य रस्त्यावरून न जाता जिंतूर शहरात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरेल.
या भागातून जिंतूरच्या बाहेर जाणारा मजूर वर्ग शेतकरी वर्ग ये- जा करत असतो. शेतातील माल जिंतूर बाजारपेठेत आणण्यासाठी सुद्धा या रस्त्याचा खूप उपयोग होणार आहे. जिंतूर शहरालगत असणारी औद्योगिक वसाहत यांना सुद्धा या रस्त्याचा उपयोग होणार आहे. या भागात विविध मंगल कार्यालय, फंक्शन हॉल आहेत शहरातील बहुतांश कार्यक्रम याच भागामध्ये होतात. शहरातीलच नव्हे तर जिंतूर तालुक्यातील लोकांना या रस्त्यात ची खूप दिवसापासून ओढ होती तसेच यावेळी शहरातील नरसिंह चौक वरुड रोड व सचिन डिपार्टमेंट आधी रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू बुधवंत, डॉ.पंडित दराडे (भाजप विधानसभा प्रमुख जिंतूर) माजी नगरसेवक ॲड.गोपाळ रोकडे, विक्की बोर्डीकर, विलास भंडारे, गणेश कुरे, मोहम्मद हकीम भाई , सुमेध सूर्यवंशी, बंटी जाधव, गणेश दराडे, सुमनताई बार्शीकर, निर्मला बांडे आदींनी मेहनत घेतली......
0 टिप्पण्या