🌟पुण्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक संपन्न.....!


🌟पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या हॉलमध्ये संपन्न झालेल्या बैठकीस 31 जिल्ह्यातून 145 प्रतिनिधी उपस्थित होते🌟


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या हॉलमध्ये संपन्न झाली.. बैठकीस 31 जिल्ह्यातून 145 प्रतिनिधी उपस्थित होते.. मराठी पत्रकार परिषदेचे तब्बल 16 प्रतिनिधी अधिस्वीकृती समितीवर नियुक्त केले गेले आहेत.. या सर्व सदस्यांचा एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार केला गेला.. तसेच बीड, कर्जत, मुंबईत गेल्या महिन्यात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमांचे उत्कृष्ठ आयोजन केल्याबद्दल तेथील पदाधिकाऱ्यांचा सत्कारही यावेळी केला गेला.



महाराष्ट्र सरकारने पत्रकार पेन्शन योजना सुरू केली असली तरी त्याचे निकष एवढे जाचक आहेत की, गेल्या चार वर्षात केवळ 130 पत्रकारांना पेन्शन मिळाली आहे.. आरोग्य योजनेची अवस्था देखील अशीच आहे.. यातून मार्ग काढून पत्रकारांना मदत करण्यासाठी अ. भा. मराठी पत्रकार परिषद 1 कोटी रूपयांचा निधी उभारत आहे.. त्यासाठी प्रत्येक तालुका संघानं एक लाख रूपये आणि जिल्हा संघांनी 3 लाख रूपये आणि प़त्येक सदस्यांनी किमान एक हजार रुपये जमा करावेत अशी अपेक्षा आहे.. मराठी पत्रकार परिषद स्वतःचे 5 लाख रुपये या कोषात गुंतवत आहे.. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने एक लाख रूपये देण्याचे बैठकीत जाहीर केले आहे.. या रक्कमेच्या ठेवीतून मिळणारया व्याजातून गरजू पत्रकारांना मदत केली जाणार आहे.. या योजनेचा सविस्तर आराखडा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे एस.एम.देशमुख यांनी जाहीर केले..


मराठी पत्रकार परिषदेमध्ये नेतृत्वाची नवी फळी तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.. त्यासाठी राज्यभरातून 25 तरूण पत्रकारांची टीम तयार करून त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविली जाणार आहे.. ही तरूण पत्रकार मंडळी परिषदेच्या विविध योजना पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करतील.. असेही एस.एम.देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले..पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषद या विंग अधिक मजबूत करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा मेळावा पिंपरी चिंचवड येथे तर डिजिटल मिडिया परिषदेचा मेळावा बीड येथे घेण्यात येणार आहे..

पुणे जिल्हा पत्रकार संघाने बैठकीचं नियोजन केलं होतं.. किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर, मन्सूरभाई शेख, नाना कांबळे, सुनील लोणकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या