🌟प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात......!


🌟केंद्रचालक जादा रकमेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन🌟

 हिंगोली (दि.04 जुलै 2023) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कॉमन सर्विस सेंटरमध्ये भरणे सुरु आहे. यासाठी अर्ज भरणे निशुल्क असून प्रिमियम सुध्दा फक्त एक रुपया आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोणताही केंद्रचालक या व्यतिरिक्त जादा रकमेची मागणी करीत असल्यास शेतकरी बांधवांनी आसेफ पठाण (भ्रमणध्वनी क्र. 9595916152) ई-मेल : Asefpatel77@gmail.com  यांच्याशी संपर्क साधावा. संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या