🌟जिल्ह्यातील झुंजार रणरागिनी आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश🌟
परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीची प्रक्रिया रद्द झाली असताना त्यासंदर्भात अपील करून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा जिल्ह्यासाठी मंजूर करून घेण्यासाठीची आपली लढाई आपण जिंकून दाखवली..
उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सुचनेनुसार आपण महाविद्यालयाची संपूर्ण प्रक्रियाच रद्द झाल्यानंतर आणि वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळणार नसल्याची शक्यता असताना अपील करून हे परभणीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर जिल्ह्याच्या पदरात पाडून घेतले आहे.
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवी शैक्षणिक क्रांती घडवणारा ऐतिहासिक निकाल आपल्या बाजूने आला.केंद्र सरकार व केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख जी मांडवीया साहेब,आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,गिरीष महाजन साहेब मनःपूर्वक आभार.. आणि माझ्यावर या संदर्भातील विश्वास दाखवणाऱ्या माझ्या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व पालकांचेही मनस्वी धन्यवाद असे उद्गार जिल्ह्यातील झुंजार रणरागिनी जनहीतवादी लोकप्रतिनिधी तथा आमच्या दिदी आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वतः जिद्दीने प्रयत्न करीत परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले असले तरी या कामी त्यांनी जिद्दीने केलेले प्रयत्न हा संपूर्ण जिल्हा कद्दापी विसरू शकणार नाही त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील जनसामान्यांनी आमदार मेघना दिदी बोर्डीकर आभार मानायलाच हवे.....
0 टिप्पण्या