🌟बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांची व जखमी प्रवाशांची नावाची यादी....!


🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी दिली भेट🌟

✍️ मोहन चौकेकर

 बुलढाणा (दि.०१ जुलै २०२३) : बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बसने पेट घेतल्याने या 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमी आणि मृतांची यादी आली आहे. या अपघातात स्त्रिया आणि मुलेही दगावली आहेत. दगावणाऱ्यांमध्ये एका प्राध्यापकाचाही समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे.


* अपघातातील मृतांची नावे :-

निखिल पाथे (यवतमाळ)

सृजन सोनोने (यवतमाळ)

कैलास गंगावणे (शिरूर, पुणे)

कांचन गंगावणे (शिरूर, पुणे)

सई गंगावणे (शिरूर, पुणे)

* अपघातग्रस्तांची नावे :-

अवंती पोहनीकर, वर्धा

संजीवनी गोटे, हिंगणघाट

प्रथमेश खोडे, वर्धा

श्रेया वंजारी, वर्धा

राधिका खडसे, वर्धा

तेजस पोकळे, वर्धा

तनिषा तायडे, वर्धा

शोभा वनकर, वर्धा

वृषाली वनकर, वर्धा

ओवी वनकर, वर्धा

करण बुधबावरे, सेलू

राजेश्री गांडोळे, आर्वी

* मुलीला नागपूरला सोडून आले अन्…

या अपघातात निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांतील तिघांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे संपूर्ण निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात प्राध्यापक कैलास गंगावणे (वय 48 ), त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय 38) आणि मुलगी सई गंगावणे (वय 20) या तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे पहाटेच ही बातमी आल्याने गंगावणे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मुळचे शिरूर येथील हे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने निरगुडसर येथे राहत होते. निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात कैलास गंगावणे गेली 27 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत होते. गंगावणे यांच्या अपघाती निधनामुळे विद्यालयावर शोककळा पसरली आहे.

नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला. सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. या तिघांचाही फोन लागत नसल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कैलास गंगावणे यांचे मेव्हणे अमर काळे यांनी शोध सुरू केला.

गंगावणे कुटुंबीयांनी या अपघाताबाबत बुलढाण्याच्या पोलीस अधिक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघातस्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत. अपघाताच्या बातमीने निरगुडसर गावासह परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांचे अश्रुंचे अक्षरक्ष बांध फुटले आहेत. शोकसंदेश व्यक्त करुन विद्यालयास सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

* कामाच्या शोधात जाताना मृत्यू :-

या अपघातात निखिल पाथे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील गोंधळी या गावाचा रहिवासी आहे. तो कामाच्या शोधत पुण्याला जात होता, असे त्याचा भाऊ हर्षद याने सांगितले आहे. यवतमाळ जिल्ह्यातीलच वैशाली नगरातील सृजन सोनोने याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी दिली भेट :-


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांकडून अपघाताचा आढावा घेतला. तसेच जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबीयांचेही सांत्वने केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा तज्ज्ञाकडून अभ्यास केला जाईल. त्यावर उपाययोजना करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी सांगितले....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या