🌟सिंगणापुर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात...!

  


🌟सिंगणापूर येथील श्री कानिफनाथ मंदिरात काल रविवार पासून झाली सुरुवात आज दुसरा दिवस🌟

परभणी (दि.१० जुलै २०२३) : तालुक्यातील सिंगणापुर येथील श्री कानिफनाथ महाराज मंदिरात संत सावता महाराज समाधी सोहळा निमित्त रविवार पासून सप्ताहाची सुरुवात झाली, सात दिवस नामवंत कीर्तनकार महाराज यांचे कीर्तन होणार आहे, यामध्ये ०९ जुलै पासून श्रीमद् संगीत भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. श्रीमद भागवत कथेचे निरूपम संकेत देव सिंगणापूरकर यांच्या रसाळ वाणीतुन करत आहेत.

सप्ताहा दरम्यान पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण,१०ते१२ गाथा पारायण,१ ते ४ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६हरिपाठ व धूप आरती, ६ते८ रामायण व सावता महाराज ग्रंथ वाचन, रात्री ८ ते १० हरिकीर्तन नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.सात दिवस नामवंत महाराज यांचे कीर्तन होणार आहे. यामध्ये  दि ९ जुलै प्रकाश महाराज साखरे बाभळगावकर,१०जुलै हभप.भागवत महाराज आवलगावकर, ११जुलै हभप.नामदेव महाराज रेंगे जामकर,१२जुलै हभप काशिनाथ महाराज माने फुरकलसकर, १३जुलै हभप नामदेव महाराज फफाळ कौडगावकर,१४जुलै हभप महामंडलेश्वर १००८ स्वामी मनीषानंद महाराज मानवतकर,१५जुलै हभप ज्ञानोबा माऊली महाराज मूडेकर,यांचे कीर्तन होतील. *रविवारी १६जुलै रोजी सकाळी१०ते११ श्री.हभप.सुदाम महाराज पिपळदरीकर यांचे पूजेचे कीर्तन होईल व किर्तनकेशरी श्री. हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे सकाळी ११ ते १ या वेळेत काल्याचे कीर्तन संपन्न होईल*. नंतर महाप्रसाद होईल,गावातील भाविक भक्त मंडळी,पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या सप्ताह आयोजन गावकरी मंडळींनीच्या वतीने करण्यात आले आहे.सप्ताह यशस्वी होण्यासाठी गावातील मंडळी व श्री.संत सावता मित्र मंडळ हे सहकार्य करत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या