🌟मतदार संघातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आमदार साहेबांचा प्रामाणिक प्रयत्न 🌟
परभणी/गंगाखेड (दि.१२ जुलै २०२३) - आपल्या संधिसाधू राजकीय स्वार्थापोटी तरुणांचा वापर करुन त्यांचे भविष्य उध्वस्त करणारे संधीसाधू राजकीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातील जनसामान्यांनी आजवर पाहिले परंतू आपल्या मतदार संघातील होतकरू सुशिक्षित तरुण बेरोजगार राहता कामा नयें असा प्रामाणिक प्रयत्न करणारा व बेरोजगारी दुर करण्याचे पोकळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करणारा लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघात प्रथमच आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका यांच्या रुपात प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील मागील राजकीय पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा इतिहास बघितल्यास असे निदर्शनास येते की मागील तब्बल तिन दशकात कोणत्याही पक्ष पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधीने गोरगरीब होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सन्मानाने जगता यावे याकरिता त्यांना नौकरी उद्योगाला लावण्याच्या दृष्टीने कधीही प्रामाणिक प्रयत्न केला नाही उलट त्याला सातत्याने बेरोजगार ठेवून त्याचा स्वतःच्या स्वार्थापोटी वापर करीत वाम मार्गाच्याच दिशेने वळवले त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण नाईलाजास्तव अवैध व्यवसायांकडे वळले ज्यात अवैध रेती तस्करी,अवैध गुटखा तस्करीसह विक्री,मटका/जुगार अड्डे,अवैध देशी/विदेशी दारू विक्री/धाबे अश्या अनैतिक व्यवसायांना आपल्या उपजिविकेचे साधन बनवलेल्या तरुणांचे अक्षरशः उभे आयुष्य उध्वस्त होण्याची अनेक उदाहरण मिळतील परंतु त्यांना एखाद्या पक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधीने आपल्या पद प्रतिष्ठेचा वापर करीत नौकरी उद्योगाला लावल्याचे एकही उदाहरण मिळणार नाही.
जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर गुट्टेंनी मात्र मतदार संघातील गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे याकरिता उद्योग व्यवसाय नौकऱ्यांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्यास सुरुवात करून बेरोजगार तरुणांच्या हृदयात आदराचे स्थान निर्माण केल्याचे पाहावयास मिळत आहे कौशल्य व गुणवत्ता असूनही गावखेड्यातल्या पोरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या वाट्याला हतबलता, निराशा आणि अवहेलना येत असते. अशा तरूणांच्या हाताला काम कसे उपलब्ध होईल.
यासाठी गंगाखेड विधानसभेचे कर्तव्यतप्तर लोकप्रतिनिधी तथा गंगाखेड-पुर्णा-पालम तालुक्याचे भूषण आ.डॉ.रत्नाकर गुट्टे व त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांच्या पुढाकारातून मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रासह राज्यभर नौकरी मेळावे आयोजित करीत आहेत. नुकताच गंगाखेड शहरात त्यांनी यशस्वी मेळावा घेतला. त्यामुळे ४० बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. त्याच सकारात्मक भावनेतून आज परभणी शहरातील युवक-युवतींसाठी जस्ट डायल या कंपनीच्या वतीने उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात एकूण ५ जणांना नौकरी मिळाली आहे. त्यामुळे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब आणि युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांनाही समाधान वाटले हि प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे सरचिटणीस रवि कांबळे आणि जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावर यांनी योगदान दिले....
0 टिप्पण्या