🌟महाराष्ट्रात भांडारकर प्राच्यविद्या संस्था स्थापना दिवस : प्राकृत शब्दकोश हा महत्त्वपूर्ण प्रकल्प...!



🌟प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती व समाज यातील गणित,व्याकरण,काव्य,चिकित्सा यांचा अभ्यास होय🌟

प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना.दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ.रा.ना.दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी वीस हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत शब्दकोश हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे. अशी अभ्यासपूर्ण माहिती अलककार- श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजी यांच्या शब्दशैलीत अवश्य वाचा... संपादक.

     प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती व समाज यातील गणित, व्याकरण, काव्य, चिकित्सा यांचा अभ्यास होय. काहीवेळा हा शब्द भारतविद्या आणि संस्कृतविद्या अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात ठाणे येथे एक प्राच्यविद्या अभ्यास संस्था आहे. तसेच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कार्यरत आहे. त्याचे संस्थापक डॉ.रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते. तसेच मधुकर ढवळीकर हेही प्राच्यविद्या संशोधक होते.

     भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे. पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्ता यांवर दि.६ जुलै १९१७ रोजी डॉ.रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था आहे. या संस्थेत अंदाजे सव्वा लाख प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच एकोणतीस हजार पाचशे दहा हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना.दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ.रा.ना.दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी वीस हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत शब्दकोश हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

    पहिल्या पिढीतील अभ्यासक आणि थोर समाजसेवक डॉ.रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. दि.६ जुलै १९१७ रोजी भांडारकर यांच्या सहस्र चंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या ताब्यात असलेला हस्तलिखितांचा ठेवा सन १९१८मध्ये संस्थेकडे देणगी म्हणून सोपविण्यात आला. प्राच्यविद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाची भूक भागविणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा सुवर्णकाळ आता इतिहासबद्ध झाला आहे. या प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्येच ग्रंथपाल म्हणून अर्धशतकाहून अधिक काळ काम पाहिलेले वा.ल.मंजुळ हे हा इतिहास लिहीत होते. सन २०१७मध्ये संस्थेच्या शताब्दी महोत्सवापूर्वी हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते. प्राच्यविद्यावरील ग्रंथ व पुस्तके- प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा: प्रकाशक साप्ताहिक विवेक, श्री उम्मेद प्राच्यविद्या ग्रंथमाला, महाराजा मानसिंह पुस्तक प्रकाशन, जोधपूर, विद्याभवन प्राच्यविद्या ग्रंथमाला, चौखंबा विद्याभवन वाराणसी, नृत्यरत्नकोश राजस्थान अशी आहेत. तर काही संस्था व केंद्रे- राजस्थान प्राच्यविद्या प्रतिष्ठान जोधपूर राजस्थान सरकारद्वारा स्थापित प्राच्यविद्या प्रतिष्ठान उदयपूर, दधिची आचार्य प्राच्यविद्या उत्थानसंघ हॉर्वर्ड कॅलिफोर्निया, राजा भर्तृहरी प्राच्यविद्या शोधसंस्थान उज्जैन मध्यप्रदेश, प्राच्यविद्या शोधसंस्थान उज्जैन मध्यप्रदेश, अखिल भारतीय प्राच्यविद्या संस्थान ब्यावर, राजेश्वरी प्राच्यविद्या शोधसंस्थान वाराणसी, बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद महाराष्ट्र, डॉ.गोस्वामी गिरधारीलाल शास्त्री प्राच्यविद्या प्रतिष्ठान दिल्ली, भोगीलाल लहेरचंद प्राच्यविद्या संस्थान दिल्ली, काशी हिंदू विश्वविद्यालय प्राच्यविद्या विभाग, संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय प्राच्यविद्या केंद्र ही आहेत.

    या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमध्ये झालेले संशोधनाचे कार्य, त्यामध्ये आपापला वाटा सक्षमपणे उचललेल्या व्यक्तींचे योगदान नव्या पिढीसमोर यावे, यासाठी हा इतिहास लिहिला गेला आहे. संस्थेच्या स्थापनेसाठी आनंदाश्रमामध्ये झालेली बैठक महत्त्वाची मानली जाते. डॉ.रामकृष्ण भांडारकर, डॉ.नरहर सरदेसाई, डॉ.श्रीपाद बेलवलकर यांचे संस्थेच्या स्थापनेपासूनचे भरीव योगदान म्हणावे लागेल. संस्थेकडील हस्तलिखितांच्या संग्रहामध्ये होत असलेली प्रगती आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न खुप मोलाचे आहेत. संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या सर्व ज्येष्ठ संशोधकांचे काम आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींचा या इतिहासामध्ये समावेश गरजेचा आहे. संस्थेत झालेल्या महाभारताची चिकित्सक आवृत्ती, धर्मशास्त्राचा इतिहास, महाभारताची स्वीकृत संहिता, महाभारताची श्लोक सूची, प्राकृत शब्दकोश अशा विविध संशोधन प्रकल्पांच्या कामांची पार्श्वभूमीही या इतिहासामध्ये समाविष्ट केली असल्याचे समजते. हे सर्वंकष मार्गदर्शक पुस्तक सुमारे तीनशे पानांचे आहे, हे विशेष!

 अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

 गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या