🌟वकिलांच्या फिचे ५५ लाख रुपये मा.मुख्यमंत्री अमरिंदर सिंग व मा.तुरुंगमंत्री सुखजिंदर रंधवा यांच्याकडून करणार वसूल🌟
पंजाबच्या भगवंत मान सरकारने उत्तर प्रदेशातील गुंड माफिया मुख्तार अन्सारीला वकील देण्याच्या प्रकरणी अत्यंत महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे मुख्तार अन्सारीच्या वकिलांच्या फिसचे ५५ लाख रुपये माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी तुरुंगमंत्री सुखजिंदर रंधवा यांच्याकडून वसूल केले जातील पैसे न भरल्यास त्याच्या पेन्शनमधून पैसे कपात केले जाणार आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल रविवार दि.०२ जुलै २०२३ रोजी सांगितले की अन्सारीला पंजाब तुरुंगात ठेवण्यासाठी राज्य सरकार ५५ लाख रुपये देणार नाही माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माजी तुरुंगमंत्री सुखजिंदर रंधावा यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे मुख्यमंत्री मान पुढे म्हणाले की, जर दोघेही पैसे भरू शकले नाहीत तर त्यांची पेन्शन आणि इतर सरकारी सुविधा रद्द करून ते वसूल केले जातील.....
0 टिप्पण्या