🌟घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केली निवेदनाद्वारे मागणी🌟
पुर्णा (दि.२२ जुलै २०२३) :- मणिपूर राज्यात झालेल्या महिला अत्याचाराच्या अमानवीय घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी विचार मंचाच्या वतीने दि.२१ जुलै २०२३ रोजी तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्याकडे निवेदनात करण्यात आली आहे.
देशातील मनिपुर राज्यात मागील दोन महिन्यांपासून हिंसाचार अत्याचाराच्या घटनेत घुमसटत असून महिलांना भर रस्त्यावर विवस्त्र करून त्यांची नग्न धीड काढून अत्यंत क्रूरपणे पाशवि अत्याचार केला जात आहे या महिलांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या कुटुंबातील पुरुषांची हत्या करण्यात आल्या लोकशाही प्रधान देशामध्ये सदरील घटना ही माणुसकीला काळिंबा फासणारी आहे अत्याचार हिंसाचार हत्या करून घटनेतील आरोपी मोकाट फिरत असून देशात भाजपची सत्ताधीश असून या घटनेवर मागील दोन महिन्यांपासून अंकुश लावण्यावर ते अकार्यक्षम झाले आहे लोकांना सुरक्षा पुरवणे हे अस स्थानिक शासन व केंद्र सरकारची जबाबदारी असताना सुद्धा शासनाकडून नागरिकांना सुरक्षा मिळत नाही त्यामुळे सदरील घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत याची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे पंतप्रधान गृहमंत्री मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच माणुसकीला काळिंबा फासणारी या घटनेतील आरोपींना गजाळ करून त्यांच्यावर जलद गतीने न्यायालयात खटला चालवण्यात यावा सदर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या घटनेची महामहिम राष्ट्रपती यांनी जातीने लक्ष घालून पीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राहुल गांधी विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष शेख ईलियास शेख महेबूब यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे त्यावेळी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष शेख रिया शेख अस्लम शेख अबू बकर सिद्दीक शेख अहमद आदींच्या स्वाक्षरी आहेत.....
0 टिप्पण्या