🌟पश्‍चिम रेल्वे विभागाने ओखा-मधुराई-ओखा या दरम्यान विशेष गाडी चालविण्याचे केले जाहीर : विशेष गाडीच्या ०४ फेर्‍या...!


🌟या गाडीला द्वितीय श्रेणी,वातानूकुलीत तृतीय श्रेणी, स्लिपर क्लास,जनरल असे २१ डब्बे असतील🌟

परभणी (दि.०४ जुलै २०२३) : गेल्या काही महिन्यातील प्रवाशांची गर्दी ओळखून पश्‍चिम रेल्वे विभागाने ओखा-मधुराई-ओखा या दरम्यान विशेष गाडी चालविण्याचे जाहीर केले असून ही विशेष गाडी चार फेर्‍या पूर्ण करणार आहे ही गाडी अकोला, वाशिम, हिंगोली,पूर्णा, नांदेड, मुदखेड मार्गे धावणार आहे. गाडी क्रमांक 09520 ओखा ते मधुराई ही विशेष गाडी 10,17,24 आणि 31 जूलै रोजी रात्री 10 वाजता ओखा येथून सुटणार असून द्वारका, राजकोट, अहमदाबाद,बोरोडा,सुरत,भूसावळ,अकोला, वाशिम,हिंगोली, पूर्णा, नांदेड, मुदखेड, काचिगुडा, करनुळ, रेणूगुंठा, काटपाढी मार्गे मधुराईस गुरुवारी सकाळी 11.45 ला पोहोचणार आहे तर गाडी क्रमांक 09519 मधुराई ते ओखा ही विशेष गाडी मधुराई येथून 14, 21, 28 जूलै व 4 ऑगस्ट रोजी शुक्रवारी रात्री 1.25 वाजता सुटणार असून आलेल्या मार्गानेच ओखा येथे रविवारी सकाळी 10.20 वाजता पोहोचणार आहे.

             या गाडीला द्वितीय श्रेणी,वातानूकुलीत तृतीय श्रेणी, स्लिपर क्लास, जनरल असे 21 डब्बे असतील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेडच्या जनसंपर्क विभागाने दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या