🌟परभणी तालुक्यातील पिंगळी जवळील तट्टूजवळा रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर आल्याने ४० मेंढ्यांचा मृत्यू....!


🌟या दुर्दैवी घटनेत १५ मेंढ्या गंभीर जखमी : मेंढपाळ तुकाराम गलांडे यांचे अंदाजे सात ते साडेसात लाख रुपयांचे नुकसान🌟  


परभणी (दि.१९ जुलै २०२३) - परभणी तालुक्यातील पिंगळी शिवारात असलेल्या तट्टूजवळा रेल्वे रुळालगत आपल्या १०० मेंढ्यांचा कळप घेऊन थांबलेल्या मेंढपाळाला डुलकी लागल्यामुळे मेंढ्यांचा कळप धावत्या रेल्वे समोर गेल्यामुळे त्यांतील ४० मेंढ्यांचा चिरडून मृत्यू तर १५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना काल मंगळवार दि.१८ जुलै २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास घडली.


या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की परभणी तालुक्यातील तट्टूजवळा येथील मेंढपाळ तथा शेतकरी तुकाराम कुंडलीक गलांडे हे सोमवार दि.१७ जुलै २०२३ रोजी रात्री आपल्या शंभर मेंढ्यांचा कळप चारण्यासाठी तट्टूजवळा येथील रेल्वे पटरी लगतच्या शेतात थांबले होते रात्रभर जागून त्यांनी मेंढ्यांची राखन केली परंतु काल मंगळवार दि.१८ जुलै २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा डोळा लागला असता या रेल्वे रुळावरून धावणाऱ्या धावत्या रेल्वे समोर मेंढ्यांचा कळप गेल्यामुळे झालेल्या या दुदैवी घटनेत त्यांच्या ४० मेंढ्या चिरडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर १५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या या घटनेची माहिती मिळताच परभणीचे तहसिलदार यांनी घटनास्थळावर  धाव घेऊन पंचणामा केला या घटनेत मेंढपाल शेतकरी तुकाराम गलांडे यांचे अंदाजे सात ते साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे...... 

 


१) रेल्वे गाडी फोटो प्रतिकात्मक..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या