🌟येत्या रविवारी दि.०९ जुलै २०२३ रोजी शिबिराचे आयोजन🌟
परभणी (दि.०७ जुलै २०२३) - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने जिल्हाभरामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी म्हणजेच दिनांक ९ जुलै २०२३, रविवार रोजी प्रहार जनशक्ती पक्ष परभणी यांच्या वतीने व लायन्स नेत्र रुग्णालय, नांदेड तसेच पांडुरंग सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरातील राजरत्न सभागृह, राजरत्न नगर, पिंगळी रोड, खानापूर फाटा परभणी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषोपचार शिबिर सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत घेण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील नेत्र तपासणी शिबिरात फक्त नेत्र तपासणी होईल त्यानंतर नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिरात इतर आजारांची तपासणी करण्यासाठी पांडुरंग सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतील तसेच रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला परभणी शहर महानगर पालिकेचे उपायुक्त श्री. जयंतजी सोनवणे, परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणजी कदम तसेच पांडुरंग सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. व्यंकटेशजी डूब्बेवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस मीडिया वैभव संघई, मीडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस ॲड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, रामेश्वर पुरी, सामाजिक कार्यकर्ते रवी कुमार नरवाडे, शाखा प्रमुख जयश्रीताई पारवे, माणिक कदम, बालाजी मगर, बाळा नरवाडे, दीपक भुस, शेख बशीर, सय्यद युनूस आदींनी केले आहे....
0 टिप्पण्या