🌟फ्रांस मधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी जिल्ह्यातील तरुणांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन....!


🌟23 वर्षाखालील तरुणांकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलम्पिक खेळासारखीच आहे🌟

परभणी (दि.07 जुलै 2023) : जागतिक कौशल्य विकास स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास उत्कृष्टता स्पर्धा असून 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलम्पिक खेळासारखीच आहे.

ही स्पर्धा जिल्हास्तर व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असते त्या प्रमाणे या वर्षी ही स्पर्धा फ्रांस ( LYON ) येथे होणार आहे. या स्पर्धेचे स्वरुप हे जिल्हा, विभाग, राज्य, देश पातळीवरुन निवड झालेल्या उमेदवारांना पुढे जागतिक स्तरावर नामांकनासाठी पाठविण्यात येत असते. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Addictive Manufacturing, Cloud Computing Cyber Security, Digital Construction. Industrial Design Technology, Industry 4.0, Information Network Gabling, Mechatronics, Robot System Integration & Water Technology या क्षेत्राकरिता उमेदवारांचा जन्म 01 जानेवारी 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये (Arts, Commerce, Science) सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये सर्व वैद्यकीय महाविद्यालये, सर्व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था व इतर प्रशिक्षण संस्था यांच्याकडील विहित वयोमर्यादेतील इच्छुक शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील प्रतिभा संपन्न, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल. या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या कडून करण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी जागतिक कौशल्य विकास स्पर्धा 2024 मध्ये सहभाग नोंदविणेसाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंक वर भेट देऊन आपली नोंदणी करुन घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452-220074 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या