🌟परभणीतील अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत शाखेच्या वतीने समान नागरी कायद्यावर व्याख्यान....!


🌟श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार 16 जूलै रोजी समान नागरी कायदा (समज-गैरसमज) विषयावर व्याख्यान🌟

परभणी (दि.13 जुलै 2023) : अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत शाखा परभणीच्या वतीने रविवार 16 जूलै रोजी समान नागरी कायदा (समज-गैरसमज) या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

           वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी सकाळी 10.30 वाजता आयोजित केलेल्या या व्याख्यानास मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. संजीव देशपांडे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.एम.के. उबाळे हे अध्यक्षस्थानी असणार असून या परिषदेस नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन परभणी अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड.एस. ए. घुगे व परभणी अधिवक्ता परिषदेचे महामंत्री अ‍ॅड. जे.बी. गिरी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या