🌟नांदेड येथील जेष्ठ पत्रकार सरदार रवींद्रसिंघ मोदी यांचा पुर्णा रेल्वे स्थानकावर सत्कार....!


🌟सरदार रवींद्रसिंघ मोदी यांना 'नेशनल इंटीग्रेशन एक्सीलेंस अवार्ड मिळाल्याबद्दल पत्रकार मित्रांनी केला सत्कार 🌟


परभणी/पुर्णा (दि.२५ जुलै २०२३) - नांदेड येथील जेष्ठ पत्रकार तथा समाजसेवक सरदार रवींद्रसिंघ मोदी यांना दि.२२ जुलै २०२३ रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत 'नेशनल इंटीग्रेशन एक्सीलेंस अवार्ड-२०२३ प्रदान करण्यात आला मानव अधिकार आणि सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था इंटरनेशनल इक्विटेबल ह्यूमन राइट्स सोशल कॉन्सिल नई दिल्ली संस्थेच्या विद्यमानाने सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान सोहळा २२ जुलै २०२३ रोजी सायंकाळी दिल्ली येथील गांधी पीस फाउंडेशन सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमात सरदार रवींदरसिंघ मोदी यांच्यासह पद्मश्री पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते सरदार जितेन्द्रसिंघ शंटी,पोलीस अधिकारी प्रशांत नेमा,रोप एथलीट जोरावरसिंघ यांच्या सह विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचे राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरव करण्यात आले.


नेशनल इंटीग्रेशन एक्सीलेंस अवार्डने सन्मानीय सरदार रवींदरसिंघ मोदी दिल्ली येथून दिल्ली-हुजूर साहीब नांदेड सचखंड एक्सप्रेसने वापस येत असतांना काल सोमवार दि.२४ जुलै २०२३ रोजी पुर्णा रेल्वे स्थानकावर शहिद उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष तथा जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्सचे संपादक/संचालक पत्रकार चौधरी दिनेश,दैनिक एकमतचे पत्रकार सुशिल गायकवाड,दैनिक लोकमतचे पत्रकार संतोष कऱ्हाळे,सामाजिक कार्यकर्ते आषिशकुमार ठाकूर यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या....  


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या