🌟महामानव तथागत भगवान बुद्धांचे मानवतावादी विचार व बुद्ध धम्म घराघरांमध्ये रुजवण्याचं काम समर्पित भावनेने मी करत आहे .....!


🌟सुप्रसिद्ध सिने अभिनेते गगन मलिक यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा (दि.०४ जुलै २०२३) - पुर्णा येथील बुद्ध विहार या ठिकाणी काल सोमवार दि.०३ जुलै २०२३ रोजी दुपारी ठीक १२.३० वाजता अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व पूज्य भदंत पैय्यावंश यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेशना बुद्ध मूर्तीचे वाटप व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो व पूज्य भदंत पय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता.


सकाळी ०५.३० वाजता त्रिरत्न वंदना पूजा परित्राण सूत्र पाठ संपन्न झाला दुपारी ठीक १२.३० वाजता सामूहिक वंदना व पूजा विधि पार पडल्यानंतर सत्कार समारंभ व बुद्ध मूर्तीचे वाटप उपासक उपासिकांना करण्यात वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी थायलंड येथील मा. फ्रा चानेक अनुन ताप्रे चा , सुप्रसिद्ध सिने अभिनेता मा. गगन मलिक कॅप्टन नट्टकीट चाईचलेरमोंगखोन मा. सॉंगथांब के र्डकेन मा. चैथा वत चंथाब्लुं ग हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सिद्धार्थ हत्ती आंबिरे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश मा. चंद्रकांत कच्छवे मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र पूर्णा. यांची उपस्थिती होती. यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते ज्यांनी तथागत भगवान बुद्धांची भूमिका चित्रपटांमध्ये साकारली ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारून संपूर्ण भारत देशामध्ये व जगामध्ये धम्म प्रचार प्रसाराचं कार्य करत आहेत उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मी संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करत आहे.

व्हिएतनाम या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानव जातीच्या कल्याणाचे विचार प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये मला यश आले आहे महाराष्ट्र मध्ये बुद्ध मूर्तीचे वाटप आम्ही गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने केले आहे. या यावेळी थायलंड या देशांमधून आलेले सुप्रसिद्ध वास्तु विशारद चाईचलेमोंगखोन कॅप्टन नट्ट कीट  सॉंग थोंब आदींनी मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी निष्ठावान भीमसैनिक आहे त्यांना अभिप्रेत असलेलं धम्मकार्य बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मी करत आहे. या प्रसंगी सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे नगरसेवक डॉक्टर बी आर आंबेडकर व बुद्ध विहार समितीचे सचिव एडवोकेट महेंद्र गायकवाड नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड  आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बी आर आंबेडकर व बुद्ध विहार स्मारक समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखापूर्णा व धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी प्रयत्न केले खीर दान मंजुषा ताई मुकुंद पाटील यांच्या वतीने करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या