🌟यावेळी उपस्थितीत सर्व शेतकर्यांना जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केले🌟
परभणी (दि.२५ जुलै २०२३)- नागपूर येथे बदली झालेल्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना आज परभणी येथील भाजीपाला उत्पादक गु्रपतर्पेâ शाल-श्रीफळ, सेवागौरव सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी उपस्थितीत सर्व शेतकर्यांना जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केले.
परभणी येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल या दोन वर्षापूर्वी झाल्या होत्या. तेव्हापासून त्या आपल्या कामाच्या झपाट्याने जनसामान्यात लोकप्रिय झाल्या. विशेषत: ग्रामीण भागातील जनता आणि शेतकरी यांच्या प्रश्नाविषयी त्यांनी उत्तम कार्य केले. भाजीपाला उत्पादक शेतकर्यांशी व्हॉटअॅपच्या माध्यमातून त्या जोडल्या गेल्या. काही शेतकर्यांची उत्पादने, फळपिके, भाजीपाला आदी मध्ये त्यांना विशेष रुची होती. नागपूर येथे असलेल्या चांगल्या कृषी उद्योगांना बोलून त्यांना परभणी येथील शेतकर्यांशी कसे जोडता येईल, यासाठी आपले प्रयत्न राहतील. परभणीच्या शेतकर्यांशी नागपुर येथेही तेथील प्रगतीशील शेतकर्यांशी बैठक लावली जाईल. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी दिले.
शेतकर्यांनी आपले उत्पादन वाढविण्याबरोबरच आपल्या उत्पन्नातील काही भाग राखून ठेवावा. पुढे मागे हीच जमापुंजी कामी येणार असते. यंदा पाऊस चांगला असेल तर पुुढील काही वर्षात पावसाची कमतरता देखील असू शकते. त्यामुळे शेतकर्यांनी नवनवीन तंत्रज्ञानानुसार शेतीवर आधारीत उभारलेल्या उद्योगांना भेटी देऊन आपल्या जिल्ह्यातही जोडधंदे उभारावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी भाजीपाला गु्रपचे पंडितराव थोरात, जनार्दन आवरगंड, प्रकाश हरकळ, रामेश्वर साबळे, रमेश चौधरी, रमेश राऊत, प्रभाकर हरकळ, विशाल जावळे, संघई, अशोक खिल्लारे, सुरेश काळे, विष्णू निर्वळ, विजय जंगले, सुदाम माने,बालासाहेब कोकर,संदेश कोकर, विठ्ठल चापके, राजु खटींग,अनिल वडजे, दिवकर राऊत, संभाजी गायकवाड, शिवाणी आवरगंड,अनुष्का जंपनगिरे,सुरेश जंपनगिरे आदींची उपस्थिती होती.....
फोटो- (२४ पी ४)
परभणी : जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना आज भाजीपाला उत्पादक गु्रप परभणी यांच्या वतीने शाल-श्रीफळ, सेवागौरव सन्मानचिन्ह देऊन निरोप देण्यात आला.
0 टिप्पण्या